Urfi Javed New Car: उर्फी जावेदने खरेदी केली Jeep Compass SUV, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Jeep Compass SUV Car: सहसा उर्फी जावेद तिच्या आगळ्यावेगळ्या डिझाइनच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र सध्या ती आणखी एका कारणाने चर्चेत आहे. हे कारण म्हणजे तिची नवीन जीप कार आहे.
Jeep Compass SUV Car: सहसा उर्फी जावेद तिच्या आगळ्यावेगळ्या डिझाइनच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र सध्या ती आणखी एका कारणाने चर्चेत आहे. हे कारण म्हणजे तिची नवीन जीप कार आहे. जी तिने मरून कलरमध्ये खरेदी केली आहे. ही एक लक्झरी SUV आहे, ज्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 21.09 लाख ते 31.29 लाख रुपये आहे. ही कार भारतात कोणत्या कारशी स्पर्धा करते आणि तिची खासियत काय आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...
Jeep Compass SUV : जीप कंपास इंजिन
ही लक्झरी कार दोन इंजिन पर्यायांसह येते. ज्यामध्ये पहिले 1.4 L टर्बो पेट्रोल इंजिन, जे जास्तीत जास्त 163 PS पॉवर आणि 250 NM पीक टॉर्क जनरेट करते. दुसरे 2 L डिझेल इंजिन, जे जास्तीत जास्त 172 PS पॉवर आणि 350 NM पीक टॉर्क जनरेट करते. तसेच 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) आणि 9 स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन (AMT) चा पर्याय ट्रान्समिशनसाठी दोन्ही इंजिनसह उपलब्ध आहे. ही 5 सीटर SUV कार डिझेल इंजिनवर 14.9 km/l पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. याची इंधन टाकीची क्षमता 60L आहे.
Jeep Compass SUV : जीप कंपास फीचर्स
या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कार कनेक्टेड तंत्रज्ञानासह 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर टेलगेट, वायरलेस फोन चार्जिंग, ऑटो एसी, 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा सारखे फीचर्स यात मिळतील. याशिवाय EBD सह ABS, 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबीलिटी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), रोलओव्हर मिटिगेशन आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारखी सेफ्टी फीचर्स देखील यात मिळतात.
Jeep Compass SUV : या कारशी करते स्पर्धा
जीप कंपासशी स्पर्धा करणाऱ्या कारमध्ये महिंद्रा XUV700 (किंमत 13.44 लाख रुपये) आणि टाटा हॅरियर (14.99 लाख रुपये) यांचा समावेश आहे. XUV700 SUV ला भारतातील सर्वात सुरक्षित कार म्हणून ग्लोबल NCAP 'सेफर चॉईस' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महिंद्रा XUV700 अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स (ADAS) सह सुसज्ज आहे. ज्यामध्ये अहेड कोलिजन वॉर्निंग, कॅमेरा आणि रडार वापरून ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेक, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि स्मार्ट पायलट असिस्ट आहेत. यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन (EBD) सारखी फीचर्स ग्राहकांना मिळतात.