Upcoming Bike Launch : भारतीय वाहन क्षेत्रासाठी 2022 सालाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी आपल्या नवीन दुचाकी लॉन्च केल्या आहेत. यात सुपरबाईक Yezdi चाही समावेश आहे. आता याच क्रमवारीत फेब्रुवारी महिन्यात अनेक नवीन दुचाकी भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहेत. या बातमीत आम्ही तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात कोणत्या बाईक लॉन्च होणार आहेत, याची माहिती सांगणार आहोत. याच लिस्टमध्ये केटीएम आरसी 390 आणि Triumph Tiger Sport 660 सारख्या जबरदस्त बाईकचाही समावेश आहे.        


New-gen KTM RC 390 


केटीएम इंडिया या महिन्यात भारतीय बाजारात आपली नवीन जनरेशन आरसी 390 लॉन्च करणार आहे. नवीन 2022 केटीएम आरसी 390 मध्ये कंपनीने बरेच नवीन कॉस्मेटिक अपडेट केले असून यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. या बाईकमध्ये कंपनीने 373.2cc, सिंगल सिलेंडर, लिक्विड कुल इंजिन दिले आहे. जे 43 hp ची पॉवर आणि 37 न्यूटम मीटर टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅनुअल गिअरबॉक्ससह येतो.  


KTM 390 Adventure 


फेब्रुवारी महिन्यात केटीएम इंडिया भारतात एक नाही तर दोन नवीनं बाईक लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. या महिन्यात कंपनी आपली दुसरी बाईक KTM 390 Adventure देखील लॉन्च करू शकते. कंपनीने या बाईकमध्ये 373.2cc सिंगल सिलेंडर, लिक्विड कुल, फ्यूल-इंजेक्टेड इंजन इंजिन दिले आहे.  हे इंजिन 43 hp आणि 37 Nm जनरेट करेल. हे इंजिन 6-स्पीड मॅनुअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.


Triumph Tiger Sport 660 


ट्रायम्फ मोटरसायकल इंडियाने आपल्या Tiger Sport 660 बाईकची डिसेंबर 2021 मध्येच प्री-बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक 50 हजारच्या टोकन किंमतसह ही बाईक बुक करू शकतात. कंपनी आपली ही नवीन बाईक फेब्रुवारीत लॉन्च करणार आहे. या बाईकमध्ये कंपनीने 660cc लिक्विड-कुल्ड इनलाईन - 3 सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 80 hp ची पॉवर आणि 64 Nm टॉर्क जनरेट करते.    


हे ही वाचा :




  • LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI