Tata Nexon vs MG ZS Facelift : Tata Nexon EV आणि MG ZS EV या सध्याच्या सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहेत. पण, लवकरच या दोन्ही इलेक्ट्रिक कार एका नवीन मॉडेलसह बाजारात उपलब्ध होणार आहेत. Nexon आणि ZS EV या दोन्ही कारला फेसलिफ्ट मिळेल. म्हणजेच या कारमध्ये मोठी बॅटरी, जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स असतील. 


Nexon EV च्या अपडेटेड व्हर्जनमध्ये 40 kWh चा मोठा बॅटरी पॅक मिळेल. कंपनीचा असा दावा आहे, की हा बॅटरी पॅक 400km पेक्षा जास्त रेंज देणारा आहे. Nexon EV ने दावा केलेली रेंज 312km आहे. तर, सध्याची रेंज सुमारे 200km पेक्षा जास्त आहे. मोठ्या बॅटरी पॅकसह, Nexon EV आता कमीत कमी 300km अंतरापर्यंत पोहोचणारी आणि कमी चार्जिंगचा वेळ घेणारीही आहे. 


MG ZS EV नवीन फेसलिफ्टमध्ये येणार आहे. म्हणजेच, या कारचा लूक आणि अधिक शानदार इंटीरियरसह ही कार लवकरच बाजारात येणार आहे. सध्याची ZS EV MG Astor ही कार जुन्या व्हेरियंटवर आधारित आहे. पण नवीन कार ZS नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि अनेक फीचर्स तसेच, मॉर्डन इंटीरियरसह उपलब्ध होणार आहे. नवीन ZS EV कार मोठ्या 51 kWh बॅटरी पॅकसह येईल जी 500 किमी रेंजपर्यंत वाढेल.


ही कार 44.5 kWh बॅटरीसह जुन्या ZS च्या सध्याच्या अधिकृत मर्यादेपेक्षा जास्त आहे. ZS चे डिझाईन फेसलिफ्टसह बदलले जाईल. यामध्ये नवीन फ्रंट आणि रियर बंपर इत्यादींचा समावेश असेल. मोठा बॅटरी पॅक Tata Nexon आणि MG ZS EV मधील अंतर वाढवेल आणि ZS ला अधिक प्रीमियम बनवणारा आहे. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI