Tesla Car : इलेक्ट्रिक कार (Electric Car) निर्माता कंपनी टेस्ला (Tesla) युनायटेड स्टेट्समधील (United States) जवळपास 54,000 वाहने परत मागवणार आहे. या कारमधील 'रोलिंग स्टॉप' (Rolling Stop) फिचरमुळे अपघात होण्याचा धोका संभावू शकतो, असे समोर आले आहे. या कार संपूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरने सुसज्ज आहेत. राष्ट्रीय महामार्ग ट्रॅफिक सेफ्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ने सोमवारी एका पत्रात ही माहिती दिली की, रोलिंग स्टॉप वैशिष्ट्यामुळे या कार न थांबता सर्व मार्ग, चौकातून प्रवास करतात ज्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो.


ऑक्टोबर 2020 पासून, Tesla ने सॉफ्टवेअरच्या बीटा आवृत्तीमध्ये नवे प्रोग्रामिंग समाविष्ट केले. हा प्रोग्राम इतर कोणतेही वाहन, सायकल किंवा पादचारी उपस्थित नसल्यास 5.6 मैल प्रति-ताशी प्रवास करताना कारला स्टॉप साईनमधून पुढे जाण्यास परवानगी देतो. मात्र, NHTSA सह दोन बैठकांनंतर, टेस्लाने 20 जानेवारी रोजी हा प्रोग्राम कारमधून निष्क्रिय करण्याचा म्हणजेच काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. NHTSA माहिती दिली आहे की, रोलिंग स्टॉप वैशिष्ट्यामुळे या कार न थांबता सर्व मार्ग, चौकातून प्रवास करतात ज्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो. दरम्यान, कार निर्मात्या कंपनीने सांगितले की, रोलिंग स्टॉपमुळे झालेल्या कोणत्याही अपघाताची माहिती नाही.



 


कंपनी 2017 आणि 2022 दरम्यान तयार केलेली मॉडेल 3 वाहने, 2016-2022 मॉडेल एस आणि मॉडेल X कार आणि 2020 ते 2022 दरम्यान तयार केलेली मॉडेल Y वाहने परत मागवणार आहे. टेस्ला या कार मालकांना कोणत्याही खर्चाशिवाय वाहनांमधील सॉफ्टवेअर अपडेट करुन पाठवेल. याआधीही ड्रायव्हर एअरबॅगच्या त्रुटी दूर करण्यासाठी मागील नोव्हेंबरमध्ये 7,600 टेस्ला कार परत मागवल्या गेल्या होत्या.


टेस्ला कंपनीचे सीईओ आणि संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांनी अंदाज व्यक्त केला की या वर्षाच्या अखेरीस पूर्णपणे ऑटोमॅटीक ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर येणे शक्य आहे, ज्याचे भूतकाळात त्यांनी वचन दिले आहे. 


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI