Tvs Motors: दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर या आर्थिक वर्षात आपल्या इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 1,000 कोटी रुपयांची गुंतवणार आहे. गेल्या आर्थिक वर्षातही कंपनीने 1,000 रुपयांची गुंतवणूक केली होती. इलेक्ट्रिक वाहनांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि अधिक नवीन वाहने विकसित करण्यासाठी कंपनीने ही गुंतवणूक केली आहे.


इकॉनॉमिक टाइम्स ऑटोशी बोलताना कंपनीचे एमडी सुदर्शन वेणू यांनी सांगितले की, कंपनी महिन्याला 25,000 युनिट इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याचे लक्ष ठेवत आहे. या वर्षानंतर 50 हजार युनिट्सपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे कंपनीची वार्षिक इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता 5 ते 6 लाख युनिटपर्यंत वाढणार आहे.


सुदर्शन म्हणाले की, 2025 पर्यंत भारतात विकल्या जाणार्‍या 30 टक्के दुचाकी आणि 35 टक्के तीनचाकी वाहने इलेक्ट्रिक असतील. हा आकडा पाहता कंपनी ईव्ही मार्केटमध्ये आपला वाटा निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी काळात बाजाराच्या मागणीनुसार इलेक्ट्रिक वाहनांचा पुरवठा करण्यासाठी कंपनी आपली उत्पादन क्षमता सुधारण्यासाठी गुंतवणूक करत आहे. ते म्हणाले की, आगामी काळात नवीन आणि जुन्या कंपन्या भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगात मोठी गुंतवणूक करतील. TVS त्यांच्या सिंगापूर व्यावसायिक शाखाद्वारे 1,100 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. कंपनी SEMG मध्ये सुमारे 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. जी गेल्या वर्षीच विकत घेण्यात आली होती.


याशिवाय कंपनी ईजीओ कॉर्पोरेशनमध्ये 130 कोटी रुपये आणि नॉर्टनमध्ये शिल्लक रक्कम गुंतवत आहे. यामुळे TVS सिंगापूरमधील एकूण गुंतवणूक 1,892 कोटी रुपये झाली आहे. TVS ने अलीकडेच आपल्या iCube इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की, या वर्षाच्या अखेरीस कंपनी दर महिन्याला iCube चे 25,000 युनिट्स बनवायला सुरुवात करेल.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI