Volvo XC40 recharge VS Kia EV6 : Volvo ने कालच (26 जुलै रोजी) भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार (EV) Volvo XC40 Recharge लॉंच केली. तर, 3 जून रोजी इलेक्ट्रिक कारच्याच्या सेगमेंटमध्ये सतत पुढे जात असलेल्या Kia india ने आपली नवीन इलेक्ट्रिक कार Kia EV6 भारतीय बाजारात लॉन्च केली. या दोन्ही इलेक्ट्रिक कार आहेत. आम्ही या दोन्ही कारची एकमेकांशी तुलना केली असता काही गोष्टी जाणवल्या. त्या कोणत्या हे जाणून घ्या. 


Volvo XC40 Recharge आणि Kia EV6 श्रेणी


XC40 रिचार्जमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि AWD सिस्टमसह 78kWh बॅटरी मिळते. या SUV ची एकूण पॉवर 408hp आणि 660Nm टॉर्क आहे. ज्यामुळे XC40 रिचार्ज फक्त 4.9 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग वाढवू शकतो. दुसरीकडे, Kia EV6 ची एकच मोटर व्हर्जन आहे, जी 340hp आणि 430Nm टॉर्क जनरेट करते तर दुहेरी मोटर व्हर्जन 325hp आणि 605Nm निर्माण करते. ते 5.2 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग वाढवते.


रेंज हे इलेक्ट्रिक वाहनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आणि येथे व्होल्वोचा दावा आहे की, XC40 रिचार्जची रेंज प्रति चार्ज 418km आहे आणि EV6 528km ची रेंज ऑफर करते. दोन्ही कारमध्ये प्रीमियम ऑडिओ सिस्टम, ADAS वैशिष्ट्ये, कनेक्टेड कार टेक आणि अनेक प्रगत वैशिष्ट्ये आहेत. 


किंमत किती? 


Volvo XC40 Recharge ची किंमत सुमारे 55.90 लाख रूपये आहे. तर, Kia EV6 ची किंमत 59.95 लाख रूपये आहे. GT लाईन AWD साठी पाहिल्यास ही किंमत 64.09 लाखांपर्यंत जाते. Kia EV6 ही एकमेव अशी कार आहे जी Volvo XC40 रिचार्जशी स्पर्धा करू शकते.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI