MG Wuling Air : सध्या बाजारात इलेक्ट्रिक कारचं प्रमाण वाढलं आहे. जास्त मायलेज आणि दमदार इंजिन देणाऱ्या या कार सगळ्यांनाच आकर्षित करतात. मात्र इलेक्ट्रिक वाहनांची किंमत मात्र सर्वसामान्यांना परवडणारी नसते. त्यामुळे प्रत्येकजण अशा कार विकत घेऊ शकत नाहीत. यासाठीच एमजी वूलिंग एअर (MG Wuling Air) ही भारतातील इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (EV) 10 लाख रूपयांपेक्षा कमी किंमतीची पहिलीच कार असण्याची शक्यता आहे. एमजी मोटर इंडियाला इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आपले स्थान निर्माण करायचे आहे. तसेच, इलेक्ट्रिक वाहनांच्या महागड्या किंमती सर्वसामान्यांना परवडतील अशा रेंजमध्ये आणण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. 


MG Wuling Air आतील बाजू : 


MG Wuling Air कारला दोन दरवाजे आहेत. ही कॉम्पॅक्ट ईव्ही आहे. या कारची लांबी पाहिल्यास 2.9 मीटर आहे. मात्र, कारच्या इंटर्नल बाजूस भरपूर जागा आहे. कारचा आतील भाग खूपच प्रीमियम आहे. MG Wuling Air मध्ये ड्युअल 10.25-इंच स्क्रीन्स आहेत. विंडोचे स्वीच मध्यभागी ठेवण्यात आले आहेत. तसेच यामध्ये एक पॉवर हॅन्ड ब्रेकदेखील देण्यात आला आहे.   


MG Wuling Air बाहेरील बाजू :


MG Wuling Air कारची बाहेरील डिझाईन फारच आकर्षक देण्यात आली आहे. यामध्ये कारच्या कलर पासून ते फ्रंंट लूक डिझाईनसह सगळ्याच गोष्टी आकर्षित करणाऱ्या आहेत. कारचा व्हीलबेस प्रत्यक्षात मोठ्या हॅचबॅक सारखाच आहे. Wuling Air 100km/h च्या टॉप स्पीडसह 40HP फ्रंट-माउंट इलेक्ट्रिक मोटरद्वारे आधारलेली आहे. नव्यानेच बाजारात पदार्पण करणाऱ्या MG Wuling Air कारची रेंज 300Km आहे. 


भारतीय बाजारात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या कारमध्ये सध्या Tata Tigor या इलेक्ट्रिक कारचा उल्लेख केला जातो. त्यामुळे MG Wuling Air ची स्पर्धा Tata Tigor शी केली जाईल हे मात्र नक्की. 2023 च्या ऑटो एक्सपो विथ इंडिया लॉन्चिंग इव्हेंटमध्ये ही इलेक्ट्रिक वाहन कार पाहायला मिळेल.    


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI