Electric Scooters For Womens : दिवसेंदिवस इंधनांच्या किमतीं वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर, पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर्सना, इलेक्ट्रिक स्कूटर हा चांगला पर्याय ठरत असून या स्कूटर्स पर्यावरणासाठी चांगल्या आहेत. शिवाय त्या वापरणे खिशालाही परवडण्याजोगे आहे. यामुळेच भारत सरकारही इलेक्ट्रिक स्कूटर्सवर भरीव सबसिडी देऊ करत आहे. दरम्यान महिलांमध्ये स्कूटी वापरण्याचे प्रमाण अधिक असल्याने महिलांसाठी टॉप10 इलेक्ट्रीक स्कूटर्स घेण्याचा पर्याय एका ऑनलाईन अॅपमधून मिळणार आहे. क्रेडआर (CredR) या अॅपमध्ये स्त्रियांसाठी परवडण्याजोग्या किंमतीत वापरलेल्या बाइक्स खरेदी करण्यासाठी आघाडीच्या टूव्हीलर्सची यादी तपासता येणार आहे. वापरलेल्या टू-व्हीलर्स उत्तम देखभाल केलेल्या असल्याने वापरकर्त्याच्या गरजा पूर्ण होणार आहेत. 


भारतातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करण्यासाठी भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत. या क्रेडआर अॅपवर इलेक्ट्रिक स्कूटर्सची संपूर्ण यादी दिलेली आहे. या स्कूटर्स भारतातील सामान्य स्कूटर वापरकर्त्याच्या दैनंदिन गरजां पूर्ण कऱण्यासाठी उत्तम आहेत. या अॅपमध्ये सर्व दरश्रेणींतील इलेक्ट्रिक स्कूटर्स बघून आणि त्यातील तुम्हाला हव्या त्या बजेटमध्ये बसणारी स्कूटर निवडण्याची मुभा असल्याचं क्रेडआरचे सीईओ, शशीधर नंदिगम यांनी सांगितलं.


या आहेत टॉप10 इलेक्ट्रीक स्कूटर्स


अँपियर झील, ओला एस1, टीव्हीएस आयक्युब इलेक्ट्रिक, अथर 450एक्स, हिरो इलेक्ट्रिक फोटॉन, बजाज चेतक, बाउन्स इन्फिनिटी ईवन, अँपियर व्ही48, ओकिनावा रिज+ आणि ई प्लुटो 7जी. या इलेक्ट्रिक स्कूटर्स सर्वात टापवर असून यांची किंमत 40 हजारे ते 1 लाख 40 हजार रुपये इतक्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे.


संबंधित बातम्या:



हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI