New Lexus ES300h Facelift : साल 1992 मध्ये सर्वात मोठा बँक घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहता यांच्याकडे 1990 मध्ये 15 ते 20 गाड्या होत्या. मात्र त्याच्या गाड्यांच्या या कलेक्शनमध्ये एक गाडी खूपच खास होती. ही गाडी होती 'लेक्सस 400'. त्यावेळी हर्षद मेहता याने 45 लाख रुपये मोजून ही कार खरेदी केली होती. संपुर्ण देशात फक्त त्याकडेच ही कार होती. हर्षद मेहता यालाही भुरळ घालणाऱ्या याच कारचा आता लेटेस्ट ES300h फेसलिफ्ट 2022 इलेक्ट्रिक मॉडेल लेक्सस इंडियाने लॉन्च केला आहे. नवीन लेक्सस कारमध्ये कंपनीने कोणत्या खास गोष्टी दिल्या आहेत. हे आपण या बातमीद्वारे जाणून घेणार आहोत.            


Lexus ES300h Facelift ही एक 'सेल्फ चार्जिंग व्हेइकल' आहे. याचा अर्थ असा की, ही कार पेट्रोल / इलेक्ट्रिक हायब्रीड पॉवरट्रेन कार्यक्षमतेच्या बाबतीत खूपच जबरदस्त आहे. आम्ही ही कार शहरात विविध ड्रायव्हिंग मोडवर चालवली आहे. ही कार 17 किमी प्रतितास इतका मायलेज देते. दिसायला अत्यंत देखणी अशी ही लक्झरी सेडान आहे. ES300h इलेक्ट्रिकचे इंजिन सुरू होताना जराही आवाज करत नाही. ही कार चालवताना तुम्हाला खूपच आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव मिळवतो.      


ज्यांना अधिक गतीत चालवायची आवड आहे, त्यांच्या पसंतीस ही कार उतरणार आहे. यामध्ये तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत. ज्यामध्ये स्पोर्ट, इको आणि नॉर्मल मोडचा समावेश आहे. याचा ग्राउंड बेस खूपच खाली असल्याने खराब रस्त्यांवर ही कार चालवताना खूपच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. असं असलं तरी या कारने काही खराब रस्त्यांवरही चांगली कामगिरी केली आहे. या कारचा ब्रेक पेडल मोठे असल्याने कारचालकाला याचा फायदा होईल, असं लेक्सस कंपनीने म्हटलं आहे.        


फीचर्स 


कंपनीने आपल्या या कारमध्ये एक मोठी लोखंडी ग्रील दिली आहे. या कारमध्ये ग्राहकांना दोन नवीन रंग पर्यायसह 18 इंचाचे wheels दिले आहेत. यामध्ये कंपनीने थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, सनशेड्स, हीटिंग/कूलिंगसह पॉवर सीट्स, 17-स्पीकर ऑडिओ सिस्टम आणि पॉवर रिक्लाइन रिअर सीट सारखे फीचर्स दिले आहेत.        


किंमत 


ES300h ची प्रारंभिक किंमत  57 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर याच्या टॉप मॉडेलची किंमत 62 लाख रुपये इतकी आहे. जी या कारच्या स्पर्धक कारपेक्षा कमी आहे. लेक्ससचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे, कंपनीने ग्राहकांना यात कसा आराम मिळेल याची काळजी घेतली आहे. तसेच यामध्ये दर्जेदार इंटीरियर देखील देण्यात आले आहे. 


या कारमध्ये आम्हाला काय आवडलं - लूक, क्वालिटी, व्हॅल्यू फॉर मनी, फीचर्स, आरामदायी अनुभव, इंधन कार्यक्षमता.


संबंधित बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI