'ही' आहे भारतातील सर्वात स्वस्त 'Family Car', 7 लोकांसाठी आहे परफेक्ट
India's Cheapest Family Car: जर तुम्ही एक मोठी फॅमिली कार घेण्याचा विचार करत असाल, ज्यामध्ये 6-7 लोक आरामात बसू शकतील. ज्याची किंमत देखील तुमच्या बजेटनुसार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
India's Cheapest Family Car: जर तुम्ही एक मोठी फॅमिली कार घेण्याचा विचार करत असाल, ज्यामध्ये 6-7 लोक आरामात बसू शकतील. ज्याची किंमत देखील तुमच्या बजेटनुसार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त MPV कारबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यामध्ये 7 लोक अगदी आरामात बसू शकतात. चला तर जाणून घेऊ कोणती आहे ही कार...
Renault Triber ही एक पॉवरफुल MPV कार आहे. ही कार भारतातील लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. याची किंमत कमी आणि फीचर्सही दमदार आहेत. या कारला 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. जी कोणत्याही अपघातापासून आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यास मदत करते. याची आसन क्षमताही 7 लोकांची असल्याने ही एक परफेक्ट फॅमिली कार आहे.
Renault Triber च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, याची प्रारंभिक किंमत किंमत 5,88,400 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. मात्र ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला ऑन-रोडसाठी थोडे अधिक पैसे द्यावे लागतील. दुसरीकडे जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिले तर तुम्हाला कळेल की या रेंजमध्ये तुम्हाला अनेक प्रीमियम हॅचबॅक कार ऑफर केल्या जात आहेत. ज्यामध्ये 5 पेक्षा जास्त लोक बसू शकत नाहीत. यापैकी अनेक हॅचबॅक कारमध्ये तुम्हाला चांगली सेफ्टी रेटिंगही मिळत नाही. इथे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की, जर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांशी तुलना केली तर तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या कुटुंबाप्रमाणे ही MPV उत्तम पर्याय ठरू शकते.
इंजिन आणि पॉवर
Renault Triber मध्ये तुम्हाला 1.0 लिटर क्षमतेचे Naturally Aspirated पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन 71bhp ची कमाल पॉवर आणि 96Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच यात 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे.
महत्वाच्या बातम्या :