Tata Punch in Bharat NCAP: Tata Punch Micro SUV भन्नाट रुपात; नवीन फिचर्स आले समोर
टाटा कार आपल्या प्रवाश्यांच्या सुरक्षिततेचा नेहमीच विचार करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, त्यातच आता टाटा पंच ही कार आपल्या नवीन सुरक्षा व्हेरिएन्टसह मार्केटमध्ये येत आहे
Tata Punch in Bharat NCAP : टाटा कार आपल्या प्रवाश्यांच्या सुरक्षिततेचा नेहमीच विचार करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, त्यातच आता टाटा पंच ही कार आपल्या नवीन सुरक्षा व्हेरिएन्टसह मार्केटमध्ये येत आहे. या कारच्या Security मध्ये आजून वाढ करण्यात आली आहे. या कारचे काही फिचर्स लीक झाले आहेत. ते फिचर्स नेमके कोणते आहेत पाहुयात...
भारत New Car Assessment Program मध्ये टाटा पंच
टाटा मोटर्स या ब्रँडने New Car Assessment Programचं चॅलेंज स्वीकारलं असून मूल्यांकनासाठी पंच, हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट सादर केले आहेत. या मॉडेल्सला आधीच ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या मॉडेल्सना 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. 2021 मध्ये ग्लोबल एनसीएपी अंतर्गत टाटा पंचची चाचणी घेण्यात आली तेव्हा त्यात ड्युअल एअरबॅगचा स्टँडर्ड म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी हायर ट्रिम्सवर पर्याय म्हणून कर्टेन एअरबॅगही उपलब्ध नव्हत्या. भारत एनसीएपी चाचणीदरम्यान टाटा पंच आता कर्टेन एअरबॅग्ससह दिसल्याने सेक्युरिटी वाढविण्यासाठी सज्ज असल्याचे नुकत्याच आलेल्या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे ह्युंदाई एक्सटर या कारमध्ये यापूर्वीच सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहे.
टाटा पंच सेफ्टी फीचर्स
टाटा पंचच्या बेसिक सेफ्टी फीचर्समध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), ब्रेक स्वे कंट्रोल आणि आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकर यांचा समावेश आहे. तर एलिव्हेटेड ट्रिम्समध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, ट्रॅक्शन कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, सेंट्रल रिमोट लॉकिंग विथ फ्लिप-की, अँटी-ग्लेअर आयआरव्हीएम, फॉलो-मी-होम हेडलॅम्प आणि रेन सेन्सिंग वायपर सारखे अतिरिक्त फीचर्स देण्यात आले आहेत.
New Car Assessment Program चाचणी कशी केली जाते?
भारत एनसीएपी हे ग्लोबल टेस्टिंग प्रोटोकॉल पाळतात आणि चाचणी केलेल्या वाहनांना स्टार रेटिंग सिस्टमअंतर्गत 1 ते 5 पर्यंत रेटींग्ज दिले जातात. एडल्ट ऑक्यूपीयर प्रोटेक्शन (एओपी), चाइल्ड ऑक्यूपीयर प्रोटेक्शन (सीओपी), और सेफ्टी एसिस्ट टेक्नोलॉजीज हे तीन निकष महत्वाचे असतात. या संपूर्ण प्रक्रियेत फ्रंटल इम्पॅक्ट टेस्ट, साइड इम्पॅक्ट टेस्ट आणि साइड पोल इम्पॅक्ट टेस्ट अशा तीन वेगवेगळ्या चाचण्यांचा समावेश आहे.
हेही वाचा:
Diesel Bike: पेट्रोल नव्हे, तर डिझेलवर चालायची Royal Enfield ची 'ही' बाईक; मायलेज 80kmpl