Tata Harrier EV: भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या (Tata Motors) इलेक्ट्रिक कार्स या देशातील टॉप सेलिंग ईव्ही आहेत. अशातच टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक (Tata Motors) कारच्या यादीत लवकरच आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार समाविष्ट होणार आहे. कंपनीने (Tata Motors) 2024 मध्ये देशांतर्गत बाजारात नवीन इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्याची योजना उघड केली आहे. ही नवीन इलेक्ट्रिक SUV कंपनीच्या Harrier SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन (EV) असेल. लवकरच टाटा हॅरियर ईव्हीचे उत्पादन सुरु होणार असून ग्राहकांना ही काही वर्षात बाजारात पाहायला मिळू शकते. इलेक्ट्रिक Harrier SUV कशी असेल याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, Tata Harrier EV सुरक्षेसाठी 360-डिग्री कॅमेरे आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सह येईल, असे म्हटले जात आहे. Tata Harrier EV नुकतीच ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. याच्या फ्यूएल मॉडेलच्या तुलनेत ही कार डिझाइनच्या बाबतीत थोडी वेगळी आहे. यात ब्लँक-ऑफ ग्रिल, एक नवीन बंपर आणि त्रिकोणी आकाराचे हेडलॅम्प क्लस्टर आहे.


मागील बाजूस, Harrier EV ला LED टेललाइट्स आणि ट्वीक्ड स्किड प्लेटसह नवीन मागील बंपर मिळतो. याच्या दरवाजावर एलईडी लाइट बार देखील आढळतो. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑल-न्यू डिझाइन ड्युअल टोन अलॉय व्हीलसह येईल.


Tata Harrier EV च्या केबिनबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या इंटीरियरमध्ये 10.25-इंचाचा टचस्क्रीन इन्फॉर्मेशन डिस्प्ले असेल. SUV पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि नव्याने डिझाइन केलेल्या कन्सोलसह येईल. ड्युअल-टोन अपहोल्स्ट्री सीट असतील. कंपनीने बॅटरी पॅक आणि ड्रायव्हिंग रेंजबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.


ऑटो सेगमेंट संबंधित या महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, टाटा समूह युरोपमध्ये इलेक्ट्रिक वाहन सेल-उत्पादन ऑपरेशन्स सुरू करण्याची योजना आखत आ.हे कारण कंपनी जॅग्वार लँड रोव्हर ब्रँडमधून बॅटरीवर चालणाऱ्या कार आणण्याचा विचार करत आहे. जग्वार लँड रोव्हर आणि टाटा मोटर्स त्यांच्या स्वतःच्या ब्रँडच्या कारसाठी बॅटरी बनवतील आणि इतर कंपन्यांना विकतील.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI