Electric Cars : सध्या देशांत इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Car) क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. देशातील जवळपास सर्वच कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कारच्या मॉडेल्सवर काम करत आहेत.. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती महाग असल्याकारणाने अनेकजण या कार खरेदी करणं टाळतात.  आज आम्ही तुम्हाला अशा काही परवडणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची माहिती देणार आहोत ज्या तुम्ही अगदी सहजपणे खरेदी करू शकता. 


1. PMV EAS e 


ही शहरी भागांत वापरता येणारी इलेक्ट्रिक कार आहे. ज्यामध्ये 48 व्होल्टची छोटी बॅटरी वापरण्यात आली आहे. यामध्ये सापडलेली इलेक्ट्रिक मोटर 13.6 पीएस पॉवर आणि 50 एनएम टॉर्क जनरेट करते. 120 किमी, 160 किमी आणि 200 किमी असे तीन प्रकारचे रेंज ऑप्शन्स आहेत. या कारचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे. या ईव्हीला ब्लूटूथ सपोर्ट इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि एलईडी हेडलॅम्प, एलसीडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डोअर लॉक/अनलॉक, कीलेस एंट्री यांसारखी अनेक वैशिष्ट्ये मिळतात. या कारची एक्स-शोरूम किंमत 4.79 लाख रुपये आहे.


2. TATA Tiago EV


Tiago EV ला 19.2kWh बॅटरी पॅकसह 61PS आणि 110Nm आउटपुट आणि 24kWh बॅटरी पॅकसह 75PS आणि 114Nm आउटपुट मिळतात. जे अनुक्रमे 250 किमी आणि 315 किमीची रेंज देतात. या इलेक्ट्रिक कारमध्ये 15A सॉकेट चार्जर, 3.3kW AC चार्जर, 7.2kW AC चार्जर आणि DC फास्ट-चार्जर असे चार चार्जिंग ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतात.


3. Tata Tigor EV


या कारमध्ये नेक्सॉन ईव्ही मधील Ziptron EV टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. या कारमध्ये 26kWh चा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे, जो इलेक्ट्रिक मोटरसह 75 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करतो. या कारला 315 किमीची रेंज मिळते. कारला 25kW DC फास्ट-चार्जर सोबत स्टँडर्ड एसी चार्जरसाठी सपोर्ट मिळतो. या कारची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे. 


4. Nexon EV Prime


नेक्सॉन EV प्राइम 30.2kWh लिथियम-आयन बॅटरीशी जोडलेल्या इलेक्ट्रिक मोटरसह 129 PS पॉवर आणि 245 Nm टॉर्क जनरेट करते. कारला ARAI प्रमाणित 312 किमीची रेंज मिळते. या कारमध्ये 3.3kW AC चार्जर आणि 50kW DC फास्ट चार्जरचा सपोर्ट आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे.


5. Tata Nexon EV Max 


Tata च्या Nexon EV Max मध्ये बसवलेली इलेक्ट्रिक मोटर 143 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. याला 40.5kWh बॅटरी पॅकसह 437 किमीची ARAI प्रमाणित रेंज मिळते. यात 3.3kW आणि 7.2kW AC आणि 50kW DC फास्ट चार्जरचा पर्याय आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 18.34 लाख रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


आकर्षक डिझाईन आणि दमदार लूकसह Kia Carnival Facelift झाली स्पॉट; लवकरच भारतात होणार लॉन्च


Car loan Information:

Calculate Car Loan EMI