Athiya Shetty-KL Rahul Wedding: चित्रपट अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) सोमवारी विवाहबंधनात अडकले. पण या सेलिब्रिटी कपल्सच्या बेस्ट कार कलेक्शनबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही तर आज आम्ही तुम्हाला याचंबद्दल सांगणार आहोत. या दोघांनाही महागड्या गाड्यांचा शोक आहे. चला तर पाहू यांच्या कार कलेक्शनमध्ये कोणत्या कार्स आहेत... 
Athiya Shetty-KL Rahul Wedding: 


K L Rahul Net Worth: केएल राहुलचे कार कलेक्शन


1. BMW X7


BMW X7 हे KL राहुलच्या कार कलेक्शनमधील पहिली गाडी आहे. BMW X7 दोन इंजिन पर्यायांसह येते. यातील पहिली स्पोर्ट ट्रिममध्ये 3.0-लीटर डिझेल आणि 3.0-लीटर पेट्रोल आहे. जे 265 hp आणि 620 Nm टॉर्क जनरेट करते. तर दुसरी 340 hp आणि 450 Nm पीक पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. ही पेट्रोल इंजिन कार फक्त 6.1 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडू शकते आणि डिझेल मॉडेलसह 7 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडू शकते. याची प्रारंभिक किंमत 1.18 कोटी रुपये आहे.


2. मर्सिडीज-बेंझ AMG C43


केएल राहुलकडे त्याच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज-बेंझ C43 देखील आहे. जी 3.0-लिटर V6 इंजिनसह येते आणि 390 hp ची चांगली पॉवर जनरेट करते. याची किंमत सुमारे 83 लाख रुपये आहे.


Athiya Shetty Car Collection: अथिया शेट्टीचे कार कलेक्शन


ऑडी Q7


अथियाने अलीकडेच नवीन ऑडी Q7 लक्झरी SUV खरेदी केली आहे. त्याच्या नवीन मॉडेलमध्ये Audi Q7 ला 3.0-लिटर 6-सिलेंडर माईल्ड हायब्रिड TFSI इंजिन मिळते. जे  340 HP आणि 500 ​​Nm पीक पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑडीच्या क्वाट्रो AWD प्रणालीद्वारे चारही चाकांना वीज पाठवते. ही कार 5.9 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडते. लक्झरी एसयूव्हीचा टॉप स्पीड 250 किमी/तास आहे. एसयूव्ही 5 मीटरपेक्षा जास्त लांब आहे आणि तिचा व्हीलबेस 3 मीटर आहे. भारतात या एसयूव्हीची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


जग्वार XJL


Jaguar XJL ची किंमत 1.15 कोटी आहे. सध्या Jaguar XJ L ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सहा प्रकारांमध्ये येते. यामध्ये डिझेल आणि पेट्रोल पर्यायांचा समावेश आहे (1999 पासून 5000 cc). ही कार 7 रंग पर्यायांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. ही कार  BMW 7 सिरीज, Audi A8 L आणि Mercedes S-Class ला टक्कर देते.


हेही वाचा : 


आकर्षक डिझाईन आणि दमदार लूकसह Kia Carnival Facelift झाली स्पॉट; लवकरच भारतात होणार लॉन्च


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI