Sushmita Sen New Mercedes Benz : सुष्मिता सेन (Sushmita Sen) ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आपलं सौंदर्य आणि अभिनय कौशल्य यामुळे सुष्मिता सेन ओळखली जाते. सुष्मिता सेन सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून नेहमीच चर्चेत असते. सध्या सुष्मिता चर्चेत आहे ती तिने घेतलेल्या नवीन कारमुळे. सुष्मिताने मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

  


सुष्मिता सेनने मर्सिडीज कार घेतली  (Sushmita's New Mercedes Benz Car) :


शनिवारी सुष्मिता सेनने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर (Instagram Account) नवीन पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून सुष्मिता सेनने चाहत्यांना तिच्या नवीन कारच्या खरेदीची माहिती दिली आहे. सुष्मिता सेनने तिच्या इन्स्टा पोस्टवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुष्मिता तिच्या नवीन मर्सिडीज बेंझबरोबर ब्लँक कलरचा ड्रेस मॅच केला आहे. 


सुष्मिता सेनच्या या कारचे मॉडेल Mercedes Benz GLE Coupe Mercedes-AMG आहे. या कारची किंमत (Car Price) तब्बल 1.64 कोटी आहे. सुष्मिता सेनने स्वतःला ही अनोखी भेट दिली आहे. इतकंच नाही तर सुष्मिता सेनने या फोटोंसोबतचा एक व्हिडीओही शेअर केला आहे ज्यात नवीन कारबाबत तिची उत्सुकता दिसते आहे. ज्यावर सुष्मिता सेनने लिहिले आहे की, 'आणि महिलांना गाडी चालवायला आवडते'. स्वतःला दिलेली ही अनमोल भेट."










'या' प्रोजेक्टमध्ये दिसणार सुष्मिता (Sushmita's Upcoming Project) :


सुष्मिता सेनने आर्या (Aarya) या वेबसिरीजच्या प्रचंड यशानंतर स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केलंआहे. आगामी काळात सुष्मिता सेन OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारच्या आर्या सीझन 3 (Aarya 3) या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय सुष्मिता सेन 'ताली' चित्रपटात किन्नरची भूमिका साकारताना दिसणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Mission Majnu : 'मिशन मजनू'ची तुलना आलिया भट्टच्या 'Raazi'शी; सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला,"एका चांगल्या सिनेमासोबत"


Car loan Information:

Calculate Car Loan EMI