Suzuki Investment in India: जपानी वाहन उत्पादक कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशन (SMC) भारतात मोठी गुंतवणूक (Investment) करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुझुकी 2026 पर्यंत गुजरातमध्ये इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरी उत्पादनासाठी 150 अब्ज येन (भारतीय चलनात 10,445 कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. 


सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने एका निवेदनात म्हटले आहे की, ''19 मार्च 2022 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या भारत-जपान इकॉनॉमिक फोरममध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.'' या करारानुसार, जपानी कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशन भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी बनवण्यासाठी 1.26 अब्ज डॉलर्सची (अमेरिकन डॉलर्स) गुजवणूक करणार असल्याची योजना आहे.


कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करणे हे सुझुकीचे ध्येय 


या इकॉनॉमिक फोरमला संबोधित करताना सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी संचालक तोशिहिरो सुझुकी म्हणाले की, "लहान कारसह कार्बन न्यूट्रॅलिटी प्राप्त करणे, हे सुझुकीचे भविष्यातील ध्येय आहे. आत्मनिर्भर भारतासाठी आम्ही येथे गुंतवणूक करत राहू." सुझुकी आपल्या भारतातील Suzuki Motor Gujarat Pvt Ltd मध्ये 2026 पर्यंत बॅटरीजच्या उत्पादन प्लांटसाठी 7,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय 2025 पर्यंत इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 3,100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 


इलेक्ट्रिक वाहनांना देणार प्रोत्साहन 


सुझुकी आपल्या समूहाची दुसरी कंपनी असलेल्या मारुती सुझुकी तोयोत्सू इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये  2025 पर्यंत वाहन रिसायकलिंग प्रकल्प उभारण्यासाठी आणखी 45 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दरम्यान, जपानच्या 'निक्केई' दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमधील सुझुकीच्या ऑटोमोबाईल उत्पादन युनिटजवळ बॅटरी प्लांट उभारण्याची कंपनीची योजना आहे. नवीन प्लांटसाठी एकूण 150 अब्ज येनची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याशिवाय भारतात इलेक्ट्रिक वाहनांनाही प्रोत्साहन दिले जाईल, अशी माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या :



Car loan Information:

Calculate Car Loan EMI