Lexus NX: कोणतीही कार पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित होण्याआधीचा मधला रस्ता म्हणजे हायब्रीड्स कार. हायब्रीड कारमध्ये दोन प्रकारचे इंजिन असतात, एक सामान्य इंधन इंजिन आणि दुसरे म्हणजे बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक मोटर. अशा प्रकारे, या गाड्या एका वेळी पेट्रोल किंवा डिझेलने चालवल्या जाऊ शकतात आणि इतर वेळी इलेक्ट्रिक मोडमध्येही गाडी चालवू शकता. नवीन Lexus NX ही हायब्रीड लक्झरी एसयूव्ही आहे. ज्यामध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स, पॉवरफुल इंजिन दिले आहे. NX ही लेक्ससची सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक आहे. भारतात याची स्पर्धा हाय-एंड मिडसाईज SUV शी आहे. 


अग्रेसिव्ह लूक   


नवीन NX ही आधीच्या मॉडेलपेक्षा दिसायला अत्यंत स्टयलिश आणि अग्रेसिव्ह लूक असणारी कार आहे. ही कार आपल्या आधीच्या मॉडेल सारखीच आकाराने मोठी आहे. याच्या समोरील बाजूस एक लोखंडी ग्रील देण्यात आली आहे. याच्या साइड व्ह्यूमध्ये एक लोअर रूफलाईन पाहायला मिळते. याची ही डिझाइन याला एक कूप एसयूव्ही बनते. यात 20 इंचाचे मोठी चाके देण्यात आली आहेत. याच्या मागील बाजूस नवीन LED टेल-लॅम्प्स लाइट बारला जोडल्या आहेत. 


इंटिरिअर आणि टच स्क्रीन 


यात पूर्णपणे नवीन इंटिरिअर देण्यात आला आहे. याच्या केबिनचा दर्जा देखील उच्च श्रेणीतील लक्झरी कार सारखाच आहे. यामध्ये कंपनीने खूप चांगल्या क्वालिटीच्या साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. यात कंपनीने एक नवीन मोठी 14 इंचाची टच स्क्रीन दिली आहे. जी पाहून तुम्ही नक्कीच आकर्षित व्हाल. यातील नवीन टच स्क्रीन जबरदस्त असून याचे रिझोल्यूशन आणि पिंच/झूम फंक्शन क्लीन/शार्प आहे. याचे  इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील डिजिटल आहे. तर ड्राईव्ह मोडसाठी आणि सिस्टिमसाठी एक वेगळी नियंत्रण प्रणाली देण्यात आली आहे. याच्या स्टीयरिंगला कॅपेसिटिव्ह कंट्रोल्स देण्यात आला आहे. 


ऑडिओ सिस्टम, स्पीकर्स आणि कार स्पेस


इतर फीचर्समध्ये 17-स्पीकर मार्क लेव्हिन्सन ऑडिओ सिस्टम, 64 कलर अॅम्बियंट लाइटिंग, वायरलेस चार्जिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, इलेक्ट्रिक फ्रंट सीट्स, इलेक्ट्रिकली फोल्डिंग रिअर सीट्स आणि बरेच काही समाविष्ट आहे. सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर, कारमध्ये लेक्सस सेफ्टी सिस्टीम सोबत एअरबॅग्ज, फ्रंट/रिअर पार्किंग सेन्सर्स देखील आहेत. यामध्ये अलार्मसह गाडी शोधण्यासाठी प्री-कॉलिजन सिस्टीम (पीसीएस), डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल-ऑल स्पीड, लेन चेंज अलर्ट आणि लेन ट्रेसिंग, ऑटो हाय बीम आणि अॅडॉप्टिव्ह हाय बीम सिस्टमचा समावेश आहे. याशिवाय ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट (आरसीटीए) आणि रिअर कॅमेरा डिटेक्शन (आरसीडी) देखील आहेत. NX मध्ये ग्राहकांना मोठो स्पेस मिळतो. तर मागील बाजूस हेडरूम अधिक चांगले होऊ शकले असते. याच्या मागील सीटमध्ये पुरेशी जागा देण्यात आली आहे. 


इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर 


ही कार कोणताही आवाज न करता अगदी आरामात सुरू होते. कारण NX पुरेशा चार्जसह फार कमी वेळेसाठी EV मोडमध्ये चालू शकते. याचे हायब्रीड सिस्टीम दोन हाय-टॉर्क इलेक्ट्रिक ड्राइव्ह मोटर-जनरेटरशी जोडलेले आहे. या कारमध्ये 2.5-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. याच्या मागील बाजूस AWD सिस्टिम इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. याचे हायब्रीड सिस्टम वेगवेगळ्या प्रकारे काम करते. ज्यामध्ये तुम्ही सामान्य किंवा हायब्रिड मोडचा पर्याय निवडून कार ड्राईव्ह करू शकतात. दररोजच्या वापरासाठी ग्राहक याच्या इको/नॉर्मल मोडचा वापर करू शकतात. याचे पेट्रोल इंजिन खूप स्मूथ असून जो तुम्हाला एक चांगला ड्रायव्हिंग अनुभव देतो. ही कार हिच्या जुन्या मॉडेलपेक्षा खूप पॉवरफुल आहे. याचे गिअरबॉक्स एक eCVT आहे, ज्यामध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे. आम्ही ही कार खडतर रस्त्यानी चालवली आहे. तसेच आम्ही याची ऑफ-रोडिंग देखील केली. जी या कारने चांगल्या प्रकरणे मॅनेज केली. Lexus ने कमी बॉडी रोल आणि उत्तम स्टीयरिंग रिस्पॉन्ससाठी यात चांगली सुधारणा केली आहे. ज्यामुळे या गाडीची राईड आणखी आरामदायी बनली आहे. 


मायलेज 


ही कार 14 ते 16 kmpl चा मायलेज देऊ शकते.  


किंमत आणि मॉडेल


कंपनीने आपल्या नवीन NX ची किंमत 64.90 लाख रुपये इतकी ठेवली आहे. तसेच बातमी दिसत असलेल्या लक्झरी ट्रिमची किंमत 69.50 लाख रुपये आहे. अडॅप्टिव्ह सस्पेंशनसह फ्लॅगशिप F-Sport ची किंमत 71.6 लाख रुपये आहे. 



  • आम्हाला काय आवडलं - लूक, फीचर्स, इंटिरिअर, कार्यक्षमता, रिफाइनमेंट, सस्पेन्शन.

  • आम्हाला काय आवडलं नाही - गाडी अधिक गतीत ड्राइव्ह केल्यास खूप आवाज करते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI