Land Rover Defender: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा अनेकदा मोठ्या आणि आलिशान वाहनांमध्ये फिरताना दिला आहे. सुनील शेट्टी याला महागड्या वाहनांची आवड आहे. अशातच आता त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका आलिशान कारची भर पडली आहे. सुनील शेट्टीने अलीकडेच लँड रोव्हर डिफेंडर 110 एसयूव्ही खरेदी केली आहे. ही एक अतिशय शक्तिशाली ऑफ-रोड एसयूव्ही आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.5 कोटींहून अधिक आहे. हीच कार अभिनेता सनी देओल, अर्जुन कपूर, मामूट्टी, पृथ्वीराज, रवी तेजा आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांसारख्या अनेक नेत्यांसह देशातील काही प्रसिद्ध लोकांनीही खरेदी केली आहे. याच कारबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 


12 रंगांमध्ये उपलब्ध आहे ही कार 


सुनील शेट्टीची लँड रोव्हर डिफेंडर 110 एसयूव्ही एक लांब व्हीलबेस (LWB) प्रकार आहे. ज्याला 5 दरवाजे आहेत. ही कार डिफेंडर 90 व्हायरपेकसह येते. सुनीलची कार फुजी व्हाईट आहे. जी खूप चमकदार आणि स्टायलिश दिसते. ही कार एकूण 12 रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.


Land Rover Defender 110 इंजिन 


या एसयूव्हीला तीन इंजिनांचा पर्याय मिळतो.  ज्यामध्ये दोन पेट्रोल आणि एक डिझेल मॉडेल उपलब्ध आहे. यापैकी 2.0-लिटर, 4-सिलेंडर युनिट आहे. जे 300 bhp पॉवर आणि 400 Nm टॉर्क 5 जनरेट करतो. दुसरे इंजिन 3.0-लिटर, 6-सिलेंडर युनिट आहे. जे 400 bhp पॉवर आणि 550 Nm टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे त्याचे तिसरे इंजिन 3.0-लिटर इनलाइन 6 टर्बो डिझेल आहे. जे 300 bhp पॉवर आणि 8-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स मिळवते.


याच्या काही प्रमुख फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, रेन सेन्सिंग वायपर, इलेक्ट्रॉनिक एअर सस्पेंशन, कनेक्टेड कार फीचर्स, कनेक्टेड नेव्हिगेशन, ऑफ रोड टायर्स, सेंटर कन्सोल, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, स्मार्ट कीलेस एंट्री, पुश स्टार्ट-स्टॉप बटण आणि बरेच काही देण्यात आले आहे. दरम्यान, सुनील शेट्टी याच्या कार कलेक्शनमध्ये Hummer H2, Jeep Wrangler, Mercedes-Benz GLS 350, Mercedes-Benz G350D आणि BMWX5 सारख्या गाड्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त Sporty Cars, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI