Toyota Glanza and Toyota HyRyder CNG: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतात एकाच वेळी आपल्या दोन नवीन सीएनजी कार लॉन्च केल्या आहेत. कंपनीने आपल्या ग्लान्झा सीएनजी आणि हायराइडर सीएनजीसह सीएनजी कार सेगमेंटमध्ये मोठा प्रवेश केला आहे. Glanza CNG दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल - S आणि G ग्रेड, मॅन्युअल ट्रान्समिशन पॉवरट्रेनच्या पर्यायासह. या दोन्ही सीएनजी कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.


इंजिन


ग्लान्झा सीएनजी व्हेरियंटला फॅक्टरी फिट सीएनजी किटसह के-सीरिज इंजिन देण्यात आले आहे आणि ई-सीएनजी ग्लान्झा 57 किलोवॅट म्हणजेच 77.5 पीएस पॉवर आउटपुट तयार करते. तसेच ही कार CNG वर 30.61 किमी/किलो मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने अर्बन क्रूझर हायरायडरच्या रूपात दुसरे CNG मॉडेल लॉन्च केले आहे. जे आतापर्यंत केवळ हायब्रीड पॉवरट्रेनसह उपलब्ध होते. हायराइडरच्या या ई-सीएनजी मॉडेलला 1.5-लीटर के-सीरिज इंजिन मिळते. जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. CNG Glanza आणि Hyryder कोणत्याही स्वयंचलित पर्यायामध्ये ऑफर केलेले नाही. Highrider CNG मायलेज देखील 26.1 किमी/किलो आहे, असा दावाही कंपनीने केला आहे. 


किंमत 


HyRyder CNG ची किमती लवकरच जाहीर केली जाईल. तर Glanza CNG ची किमती कंपनीने जाहीर केली आहे. ही कार सीएनजी मॉडेलमध्ये जी व्हेरिएंटसाठी 843,000 रुपये आणि एस व्हेरिएंटसाठी 946,000 रुपयांना उपलब्ध असेल. दरम्यान, या दोन्ही सीएनजी कार्ल भारतात कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावं लागेल.


HyRyder CNG फीचर्स


Mercedes-Benz भारतात डिसेंबर महिन्यात लॉन्च करणार दोन नवीन एसयूव्ही, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


किती असेल HyRyder CNG ची किंमत? 


HyRyder सीएनजीसह येणारी देशातील पहिली एसयूव्ही असेल, फॅक्टरी फिट सीएनजी किटसह एसयूव्ही आणण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत कोणतीही एसयूव्ही सीएनजीसह उपलब्ध नव्हती. आता HyRyder च्या खरेदीवर ग्राहकांना अधिक स्ट्रॉंग हायब्रीड आणि CNG चा पर्याय मिळेल. जे भारतात इतर कोणतीही कंपनी सध्या तरी देत नाही आहे. HyRyder CNG ची किंमत 1.5L माईल्ड हायब्रिड व्हेरियंट पेक्षा जास्त असू शकते.


इतर महत्वाची बातमी:


सुनील शेट्टीने खरेदी केली नवीन Land Rover Defender 110 एसयूवी, जाणून घ्या किती आहे किंमत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI