Electric Car : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहाता, इलेक्ट्रिक कार हा एक चांगला पर्याय ठरतो आहे. ऑटोमोबाईल उत्पादक आणि सर्व सामान्य लोकांचा देखील कल या इलेक्ट्रिक कार घेण्याकडे वळतो आहे. कंपन्यांनी पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर नवनवीन इलेक्ट्रिक कार विकसित करण्याची संधी घेतली आहे, तर काहींनी इलेक्ट्रिक पॉवरट्रेनला समर्थन देण्यासाठी विद्यमान प्लॅटफॉर्मचे विद्युतीकरण सुरू केले आहे.

बहुतेक लोकांनी आता इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार सुरू केला आहे. काही जणांनी घेतली सुद्धा असेल, पण जर तुम्हीही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर इलेक्ट्रिक कार घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरुन तुम्हाला त्याचा फायदा होईल तर त्या गोष्टी आपण पाहूया.


इलेक्ट्रिक कारमध्ये काय महत्त्वाचे


1) चार्जिंग सुविधा


इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्थिती. ग्राहकाच्या घराजवळ चार्जिंग स्टेशन आहेत की नाही आणि त्याच्या घरी चार्जिंगची सुविधा आहे की नाही ही गोष्ट अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कार चार्ज करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ती जेथे पार्क केली जात आहे तेथे चार्जिंग सुविधा असणे जास्त सोयीचे ठरेल.


2) श्रेणी (रेंज)


जर कोणी शहराच्या ठिकाणी तुम्ही रोजच्या वापरासाठी इलेक्ट्रिक कार खरेदी करत असाल आणि शहरामध्ये प्रवास नियमित असेल, तर तो कमी ड्रायव्हिंग रेंजसह लहान इलेक्ट्रिक वाहनांची निवड करू शकतो. कारण ही कार घरबसल्या सहज चार्ज करता येते. मात्र, लांबचा प्रवास करायचा असेल तर लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक वाहनाने जावे लागते. सहसा अशी वाहने महाग असतात.

3) कार कोणत्या प्रकारची असावी


बहुतेक लोक सेडान आणि हॅचबॅकऐवजी एसयूव्हीला प्राधान्य देऊ लागले आहेत. इलेक्ट्रिक हॅचबॅक सर्वात स्वस्त आहेत आणि नंतर कॉम्पॅक्ट सेडान येतात. कॉम्पॅक्ट SUV ची किंमत कॉम्पॅक्ट सेडानपेक्षा जास्त असते आणि त्यानंतर क्रॉसओवर असतात. प्रिमियम इलेक्ट्रिक वाहने देखील आहेत, ज्यांची किंमत पारंपारिक इलेक्ट्रिक कारपेक्षा खूप जास्त आहे.

4) किंमत

सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे Tata Tiago EV.जी नुकताच लॉन्च करण्यात आली आहे. त्याची किंमत ₹ 8.49 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते परंतु बहुतेक लोकांसाठी, ती फक्त शहरातील प्रवासासाठी चांगली आहे. जर एखाद्याला लांबच्या प्रवासाला जायचे असेल तर, टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्स सारख्या कारचा विचार करावा लागेल, ज्याची किंमत 18.34 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्यामुळे, एखाद्या व्यक्तीला अधिक ड्रायव्हिंग रेंज हवी असल्यास त्याला अधिक खर्च करावा लागेल.

 

या प्रमुख गोष्टी लक्षात ठेवल्या तर इलेक्ट्रिक कार घेण्यापूर्वी सुविधा, तुमच्या गरजेनुसार रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कारला आणि किंमत या गाड्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरतील आणि तुम्हाला गाडी घेताना, निवडताना उपयोगी ठरतील.

 

ही बातमी देखील वाचा



 





Car loan Information:

Calculate Car Loan EMI