Affordable Powerful Cars: भारतात स्पोर्ट्स कारसाठी एक वेगळीएच क्रेज आहे. भारतीय ग्राहकांची स्पोर्ट्स कारची (sports car) पसंती पाहता अनेक परदेशी कार कंपनींही भारतात आपल्या स्पोर्ट्स कार (sports car) लॉन्च केल्या आहेत. यात प्रसिद्ध लॅम्बोर्गिनी (lamborghini) आणि फेरारी (ferrari) सारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. ज्यांनी देशात आपले शोरुमही सुरु केले आहेत. मात्र या गाड्यांच्या किमती जास्त असल्याने याची तितकीशी विक्री होत नाही. असं असलं तरी देशात काही परवडणाऱ्या स्पोर्ट्स कार देखील आहेत. ज्या पॉवरफुल इंजिनसह स्पोर्टी फील देतात. तुम्हालाही अशा गाड्या आवडत असतील तर तुमची ही इच्छा फक्त 8 लाख रुपयांमध्ये पूर्ण होऊ शकते. चला जाणून घेऊ देशात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त स्पोर्ट्स कार्स बद्दल...
Hyundai Grand i10 Nios Turbo
Grand i10 Nios Turbo मध्ये 1.0-लिटर तीन-सिलेंडर T-GDi टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. जे 100 PS पॉवर आणि 172 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. तसेच यात अनेक जबरदस्त फीचर्स देखील उपलब्ध आहेत. ही एक अतिशय आलिशान स्पोर्ट्स कार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 8.02 लाख रुपयांपासून सुरू होते.
Tata Altroz iTurbo
Tata Altroz iTurbo ही एक स्पोर्टी हॅचबॅक कार आहे. यात कंपनीने1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 110 PS पॉवर आणि 140 Nm टॉर्क जनरेट करते. यात मानक म्हणून 5-स्पीड ट्रान्समिशन मिळते. आलिशान फीचर्ससोबतच या कारमध्ये सुरक्षेकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.25 लाख रुपये इतकी आहे.
Hyundai i20 N Line
Hyundai आपली हॅचबॅक कार i20 स्पोर्टी प्रकारात N Line च्या रूपात ऑफर करते. Hyundai i20 Nline मध्ये 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. जे 120 PS पॉवर आणि 172 Nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 6-स्पीड iMT आणि 7-स्पीड DCT गिअरबॉक्सचा पर्याय आहे. कारला चारही चाकांवर डिस्क ब्रेकसह स्पोर्टियर एक्सटीरियर्स, इंटिरियर्स आणि ड्युअल एक्झॉस्ट मिळतात. या कारची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपये आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI