Honda Shine 100 vs Hero Splendor vs Bajaj Platina: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India) ने नुकतीच आपली शाईन 100 (Hero Shine 100) देशात लॉन्च केली आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत (Ex-Showrrom Price) 64,900 रुपये ठेवण्यात आली आहे. आधीपासून अस्तित्वात असलेल्या हिरो स्प्लेंडर प्लस (Hero Splendor Plus) आणि बजाज प्लॅटिना 100 (Bajaj Platina 100)ला ही नवीन बाईक कशी टक्कर देते हे पाहूया...


शाईन 100 V/s स्प्लेंडर V/s प्लॅटिना: डिझाइन आणि रंग


या सर्व बाईक अगदी साध्या डिझाइनमध्ये येतात, कारण त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात बसतील अशा पद्धतीने बनवल्या गेल्या आहेत. नवीन होंडा शाईन 100 ही बाईक पाच रंगांत उपलब्ध आहे. बजाज प्लॅटिना चार रंगांत आणि हिरो स्प्लेंडर प्लस बारा रंगांच्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.


शाईन 100 V/s स्प्लेंडर V/s प्लॅटिना: इंजिन


होंडा शाईन 100 ला 98.8 CCचे सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे. जे 7.2 बीएचपी पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 4 स्पीड गिअरबॉक्स आहेत. ही बाईक 60-70 किमी/ली मायलेज देते.


स्प्लेंडर प्लसला 97.2 CCचे सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्‍टेड इंजिन आहे. जे 7.9 बीएचपी पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 4 स्पीड गिअरबॉक्स आहे. ही बाईक देखील 60-70 किमी/ली मायलेज देते.


प्लॅटिना 100 ला 102 CCचे सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे त्यातून 7.7 बीएचपी पॉवर मिळते आणि 8.03 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 4 स्पीड गिअरबॉक्स आहे. ही बाईक देखील 60-70 किमी/लि मायलेज देते.


शाईन 100 V/s स्प्लेंडर V/s प्लॅटिना: फिचर्स


या तिन्ही बाईकला टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक अ‍ॅब्जॉबर आहेत. याला एकत्रित ब्रेकिंग सिस्टमसह दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक मिळतात. शाईन 100 आणि प्लॅटिनाला बेसिक अ‍ॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो, तर स्प्लेंडर प्लसच्या XTEC व्हेरियंटला डिजिटल कन्सोल मिळतो.


शाईन 100 V/s स्प्लेंडर V/s प्लॅटिना: किंमत


होंडा शाईन 100 बाजारात एकाच प्रकारात उपलब्ध आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 64,900 रुपये आहे. तर, बजाज प्लॅटिना देखील त्याच प्रकारात रुपये 65,856 च्या एक्स-शोरूम किमतीसह उपलब्ध आहे. हिरो स्प्लेंडर प्लस विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 73,481 रुपये ते 77,745 रुपये इतकी आहे.


 


संबंधित बातम्या : 


TVS Company History:  बस कंपनी ते देशातील आघाडीची दुचाकी कंपनी; 'टीव्हीएस'ची मुहूर्तमेढ रोवणारे अय्यंगार


Car loan Information:

Calculate Car Loan EMI