New Honda Shine 100cc Bike: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Honda Motorcycle and Scooter India ने भारतात नवीन Honda Shine 100 लॉन्च केली आहे. भारतीय बाजारपेठेत कंपनीने याची किंमत 64,900 रुपये ठेवली आहे. ही बाईक लिवो आणि सीडी 110 सोबत विकली जाईल. मात्र ही बाईक शाईन 125 च्या खाली असेल. या बाईकमध्ये कंपनीने कोणते खास फीचर्स दिले आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...


New Honda Shine 100cc Bike: इंजिन 


Honda Shine 100 नवीन 100cc इंजिनसह येते, जे चांगले मायलेज आणि कमी उत्सर्जनासाठी ट्यून केलेले आहे. या बाईमध्ये लांब सीट देण्यात आली आहे. जी रोजच्या वापरासाठी खूपच आरामदायी आहे. याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, ही सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे आणि मायलेज सुधारण्यासाठी याला ASP (eSP) आणि इंधन इंजेक्शन तंत्रज्ञान देण्यात आले आहे. यात ऑटो चोक सिस्टीम देखील आहे. याचे 100 सीसी इंजिन 7.6 bhp पॉवर आणि 8.02 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. हे नवीन BS6 नियमांनुसार डिझाइन केले गेले आहे. Honda Shine 100 एकूण 5 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.


ही बाईक डायमंड फ्रेमवर तयार केली गेली असून तिला 168 मिमीचा ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. डिझाइनच्या बाबतीत, याला शाइन 125 ची एक छोटे व्हर्जन म्हणता येईल. याच्या लूकमध्ये कोणतेही मोठे बदल दिसत नाहीत. Honda Shine 100 ला इंजिन इनहिबिटरसह साइड स्टँड देखील मिळतो. या फीचर्समुळे बाईक साइड स्टँडवर असल्याशिवाय इंजिन सुरू होत नाही. यासोबतच नवीन शाईनमध्ये कॉम्बी ब्रेक सिस्टिमही देण्यात आली आहे.


New Honda Shine 100cc Bike: आजपासून बुकिंग सुरू


Honda Shine 100 ची आजपासून देशभरात बुकिंग सुरू झाली आहे. याचे उत्पादन पुढील महिन्यापासून सुरू होईल, तर Honda Shine 100 ची डिलिव्हरी मे 2023 पासून सुरू होईल. शाइन 100 ची खरेदी कंपनीच्या विशेष 6 वर्षांच्या वॉरंटी पॅकेजसह येईल, ज्यामध्ये 3 वर्षांची मानक आणि 3 वर्षांची वैकल्पिक विस्तारित वॉरंटी समाविष्ट आहे. Honda Shine 125 हे कंपनीचे लोकप्रिय मॉडेल आहे आणि अशा परिस्थितीत कंपनीने 100 सीसी सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी Shine 100 आणले आहे. कंपनीचे हे उत्पादन ग्रामीण भागातील बाजारपेठ लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे.


या बाईकशी होणार स्पर्धा 


देशांतर्गत बाजारपेठेत 100cc Honda Shine हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना यांच्याशी स्पर्धा करेल, जे या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI