Bajaj Pletina BS6: बजाज प्लॅटिना ही भारतीय दुचाकी बाजारात सर्वाधिक मागणी असलेल्या बाईक्सपैकी एक आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे याचे जबरदस्त मायलेज (best mileage bike in india). कंपनीने नुकतेच याचे लेटेस्ट व्हर्जन लॉन्च केले आहे. ज्यात सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. नवीन अपडेटेड प्लॅटिना Honda CD 110 Dream Deluxe आणि Hero Passion Pro मोटरसायकलशी टक्कर देईल. या अपडेटेड मायलेज किंग मायलेज (Best Mileage Bike in India) किंग बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...


Bajaj Platina Bs6 Mileage: नवीन बजाज प्लॅटिना 110 डिझाइन


बाईकमध्ये Quilt-Stitched सीट, रुंद रबर फूटपॅड, टाकी पॅड आणि मागील सस्पेन्शन याशिवाय 11-L क्षमतेची उतार असलेली इंधन टाकी तसेच डिजिटल स्पीडोमीटर, डेटाइम रनिंग लाइट्स (DRL), हॅलोजन हेडलॅम्प, बल्ब टेललाइट्स आणि काळ्या रंगाचे मिक्स मेटल व्हील्स दिले आहेत.


Bajaj Platina Bs6 Mileage: इंजिन 


या बाईकच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात BS6 स्टँडर्ड 115.45cc 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे 8.4hp ची पॉवर आणि 9.81Nm चा सर्वाधिक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. तर याचा टॉप स्पीड 110 किमी प्रतितास असेल. याच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही बाईक 60 kmpl पर्यंत मायलेज (Best Mileage Bike in India) देऊ शकते.


Bajaj Platina 110 Bs6 Mileage Per Liter: फीचर्स 


उत्तम राइडिंग आणि सुरक्षितता लक्षात घेऊन, बाईकच्या समोरील बाजूस डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस सिंगल-चॅनल ABS सह ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. यासोबतच यामध्ये कंबाईन ब्रेकिंग सिस्टीम (CBS) देखील देण्यात आली आहे. तसेच सस्पेन्शन आरामदायी बनवण्यासाठी या बाईकमध्ये 135mm हायड्रोलिक-टेलिस्कोपिक-प्रकारचे फ्रंट फोर्क्स आणि 110mm ड्युअल स्प्रिंग रिअर शॉक ऍब्जॉर्बर्स देण्यात आले आहेत.


Bajaj Platina 110 Bs6 Price: किंमत 


नवीन प्लॅटिना 110 बाइक एबोनी ब्लॅक, ग्लॉस प्युटर ग्रे, कॉकटेल वाईन रेड आणि सॅफायर ब्लू या चार रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. याची किंमत 72,224 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. बजाजची ही नवीन BS6 मानक बाईक Honda च्या CD 110 Dream Deluxe आणि Hero Passion Pro बरोबर स्पर्धा करेल.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI