OLA S1, S1 Pro : ओला इलेक्ट्रिक स्कूटर,  Ola S1 आणि Ola S1 Pro ची भारतात सर्वाधिक चर्चा आहे. ओला इलेक्ट्रिकनं दिलेल्या माहितीनुसार, ओला एस1 आणि ओला एस 1 प्रो दोन्ही स्कूटर भारतात बुकिंग सुरु झाल्यापासूनच चर्चेत आहे. दरम्यान, बुकिंग सुरु झाल्यानंतर प्रोडक्शनमध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिलिव्हरीची तारिख पुढे ढकलण्यात आली. आता ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितल्यानुसार, ओला इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी 15 डिसेंबर 2021 पासून सुरु होणार आहे. म्हणजेच, 10 दिवसांनी ग्राहकांना ओला स्कूटरची डिलिव्हरी मिळणार आहे. 


काही दिवसांपूर्वी ओला इलेक्ट्रिकनं म्हटलं की, ते ऑर्डरवर नेदरलँड्सच्या दुतावासासाठी नऊ  OLA S1 Pro स्कूटर तयार करत आहेत. भारतातील नेदरलँडच्या तीन राजकीय मोहिमांमध्ये ही स्कूटर वापरली जाणार आहे. तसेच ही स्कूटर नेदरलँड्सचा अधिकृत रंग आणि देशातील अधिकृत लोगोसोबत येणार आहे. ओला इलेक्ट्रिकनं पुढील वर्षी आपली इलेक्ट्रिक स्कूटर युरोप, यूके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण पूर्व आशिया आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.


10 लाख स्कूटर्सची बुकिंग 


ओला इलेक्ट्रिकनं दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला जवळपास 10 लाख इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग मिळाली आहे, ओला इलेक्ट्रिक सध्या आपल्या त्या ग्राहकांसाठी टेस्ट राइड उपलब्ध करुन देत आहे. ज्यांनी S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर बुक केल्या आहेत. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी 20,000 टेस्ट राइड्स पूर्ण केल्या आहेत. या वर्षाच्या शेवटापर्यंत 10 हजार आणखी राइड्स पूर्ण करण्याचं कंपनीचं टार्गेट आहे. 


Ola S1 ची भारतातील किंमत 9,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर Ola S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या दोन्ही किमती प्रत्येक राज्यात प्राप्त झालेल्या अनुदानित इलेक्ट्रिक वाहनाशिवाय सूचीबद्ध केल्या आहेत. Ola S1 ची रेंज 121 किमी आणि टॉप स्पीड 90 किमी प्रतितास असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. तर दुसरीकडे  Ola S1 Pro मध्ये 181 किमीची रेंज असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर टॉप स्पीड 115 किमी प्रति तास आहे. स्कूटर ब्लॅक, पिंक, यलो, ब्ल्यू, व्हाइटसह इतरही 10 कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ola Electric Scooter Launch: ओला स्कूटर भारतात लॉन्च, पाहा किंमत आणि फीचर


दिवसभरातील बातम्या लाईव्ह पाहण्यासाठी एबीपी माझा युट्यूब चॅनलवर भेट द्या



Car loan Information:

Calculate Car Loan EMI