Audi Q7 : ऑडी ही भारतातील सर्वात लोकप्रिय असलेल्या गाड्यांपैकी एक गाडी. भारतात सुरुवातीच्या काळात ज्या काही कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या स्थापन झाल्या त्यामध्ये या जर्मन कंपनीचा समावेश होतो. आता या कंपनीकडून Audi Q7 ही कार लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये नव्या मेट्रिक्स एलईडी हेडलॅम्प, सिंगल फ्रेम ऑडी ग्रिल आणि एयर इंटेकची सुविधा आहे. Audi Q7 ने आपला लूक पूर्ण बदलला आहे. यामध्ये वेगवेगळा कलर ऑप्शन उपलब्ध आहे.
Audi Q7 मध्ये नव्या बॉडी क्लॅडिंग आणि अत्याधुनिक बंपर सेट अप आहे. इंटेरियरमध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे आणि यामध्या नवीन ट्वीन स्क्रिन सेंटर कंसोल आहे. Audi Q7 च्या संपूर्ण डिझाईन बदलण्यात आलं आहे आणि त्यामुळे त्याला एक शानदार लूक मिळाला आहे.
इंटिरिअरमध्ये नव्या क्रोम, अॅल्यूमिनिअम हायलाईट्स सोबतच दोन टचस्क्रिन आणि एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. प्रीमियम ऑडियो सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल आणि हेड-अप डिस्प्ले सहित इतर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. सर्वच नव्या ऑडी कार प्रमाणे Audi Q7 ही देखील पेट्रोल कार आहे पण V6 यूनिट सोबत माईल्ड हायब्रिड आणि काही इलेक्ट्रिकल असिस्सटन्स असेल.
Audi Q7 च्या कार्यक्षमतेत अधिक वाढ करण्यात आली आहे तसेच त्यामध्ये कार्टो सिस्टमची सुविधा देण्यात आली आहे. Audi Q5 च्या विक्रीमध्ये अधिक जलदता आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि येत्या काळात त्याच्या SUV च्या रेंजमध्ये वाढ करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
- Upcoming Bike and Scooter : डिसेंबरमध्ये येणार 'या' दमदार बाईक, किंमत 60 हजार रुपयांपासून सुरु
- Mercedes AMG A 45 S : स्पोर्टस कारला टक्कर देणारी 'Mercedes AMG A 45'
- MG Gloster Anniversary : अतुलनीय आणि सर्वोत्तम फीचर्स देण्यात आघाडीवर
Car loan Information:
Calculate Car Loan EMI