Mercedes Benz Vision EQXX: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझने आपली सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रिक कार (Electric Car) भारतात (Electric Car In India) सादर केली आहे. या कारच नाव आहे Mercedes Benz Vision EQXX. ही कार एका चार्जमध्ये मुंबई (Mumbai) ते नागपूर (Nagpur ) गाठू शकते. या इलेक्ट्रिक कारची (Electric Car) रेंज तब्बल 1,000 किमी इतकी आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर सर्वाधिक रेंज देणारी कार ठरणार आहे. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये इतकी रेंज देण्यात कोणीही याच्या जवळपास ही नाही. कंपनीने ही कार भारतात ग्लोबल प्रीमियर दरम्यान सादर केली आहे. म्हणजेच येत्या काळात ही कार भारतातही लॉन्च केली जाऊ शकते.


Mercedes Benz Vision EQXX कंपनीच्या भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित आहे. या कारमध्ये फ्युचरिस्टिक डिझाइन आणि तंत्रज्ञान वापरले आहे. ही पूर्णपणे एरोडायनामिक आहे, ज्यामुळे याची बॅटरी कार्यक्षमता 95 टक्के आहे. 


Mercedes Benz Vision EQXX Range : 1200 किमी रेंज 


मर्सिडीजने या इलेक्ट्रिक कारमध्ये 100 kW क्षमतेची पॉवरफुल बॅटरी वापरली आहे. यामुळे ही कार पूर्ण चार्ज केल्यावर 1,200 किमीची रेंज देईल, असा दावा करण्यात येत आहे. या कारमध्ये स्थापित इलेक्ट्रिक मोटर 245 bhp पॉवर जनरेट करते. बॅटरीची क्षमता मोठी असूनही या कारचा आकार लहान आहे. ही कार आपल्या क्षमतेच्या इतर बॅटरीच्या जवळपास निम्मी आहे. यामुळे कारच्या बॅटरी 100 kWh प्रति किलो इतकी सर्वाधिक ऊर्जा खर्च करते.


Mercedes Benz Vision EQXX:140 किमी/ताशी कमाल वेग


टेस्टिंग दरम्यान व्हिजन EQXX चा टॉप स्पीड 140 किमी/ता इतका नोंदवला गेला आहे. EQXX चे वजन 1,750 किलोग्रॅम आहे. जे चार सीटर सेडानपेक्षा हलके आहे. मर्सिडीज-बेंझ, टेस्ला (Tesla Electric Car) आणि निओ (Nio Electric Car) सारख्या कंपन्या सर्वाधिक रेंज असलेल्या इलेक्ट्रिक कारच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. या कंपन्यांचा विश्वास आहे की हाय रेंजच्या इलेक्ट्रिक कार (Electric Car) शॉर्ट रेंज आणि चार्जिंग पायाभूत सुविधांच्या अभावाची चिंता संपवतील आणि सामान्यतः पेट्रोल कार प्रमाणेच वापरल्या जातील.


इतर ऑटो संबंधित बातम्या: 


Mahindra Scorpio N: महिंद्रा स्कॉर्पिओ एन कारला मिळाली 5 स्टार सुरक्षा रेटिंग, आनंद महिंद्रा यांनी टीमचं केलं कौतुक


Car loan Information:

Calculate Car Loan EMI