Mahindra Scorpio N: कार सेफ्टी टेस्ट संस्था ग्लोबल NCAP ने #SaferCarsForIndia या मोहिमेअंतर्गत देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या क्रॅश टेस्टचा रिपोर्ट जाहीर केला आहे. यामध्ये ग्लोबल NCAP ने भारतातील चार सर्वाधिक मागणीअसलेल्या कारची क्रॅश टेस्टिंग केली आहे. ज्यात महिंद्रा स्कॉर्पिओ-एन, मारुती सुझुकी एस-प्रेसो, स्विफ्ट आणि इग्निस यांचा समावेश आहे. या टेस्टमध्ये स्कॉर्पिओ-एनला 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील यासाठी आपल्या टीमचं कौतुक केलं आहे.

  

आनंद महिंद्रा ट्विट करून म्हणाले आहेत की, ''आर अँड डी टीमने केलेल्या कामगिरीने माझी छाती अभिमानाने फुलली आहे. त्यांनी ठरवलं, सुरक्षिततेच्या बाबतीत आम्ही जगात कोणाच्याही मागे राहणार नाही. यानंतर ते कमला लागले आणि हे स्वप्न सत्यात उतरवलं.''    







Scorpio N Is the Safest Car in the Country : Scorpio N आहे देशातील सर्वात सुरक्षित कार


Mahindra Scorpio-N ने ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये प्रौढ व्यक्तींच्या संरक्षणासाठी 5 स्टार आणि लहान मुलांच्या संरक्षणासाठी 3 स्टार मिळाले आहेत. SUV ने अनुक्रमे 34 पैकी 29.25 आणि 49 पैकी 28:93 गुण मिळवले. स्कॉर्पिओ N च्या बॉडीशेल इंटिग्रिटीला स्थिर रेटिंग देण्यात आली आहे. ग्लोबल एनसीएपीच्या क्रॅश टेस्टच्या निकालांनुसार, स्कॉर्पिओ-एन ही देशातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे.


मारुतीच्या कारची खराब कामगिरी 


मारुती सुझुकीच्या तीन कार स्विफ्ट, एस-प्रेसो आणि इग्निसचा ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये सर्वाना मुलांच्या सुरक्षिततेसाठी फक्त 1 स्टार रेटिंग मिळाले आहे. स्विफ्टला चाइल्ड ऑक्युपंट संरक्षणासाठी 1 स्टार मिळाला, तर S-Presso आणि Ignis ला 0 स्टार मिळाला आहे. या तिन्ही मारुती कारच्या बॉडीशेल्सला अस्थिर मानण्यात आले आहे, जे फॉरवर्ड लोड सहन करण्यास सक्षम नाहीत.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI