Bajaj Pulsar 150 Discontinued: देशातील सर्वात लोकप्रिय दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या बजाज ऑटोने भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय मॉडेलपैकी एक असलेल्या बजाज पल्सर 150 चे उत्पादन थांबवले (Bajaj Pulsar 150 Discontinued) आहे. पल्सर 150 आणि पल्सर 180 हे कंपनीसाठी सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहेत. या बाईकने जवळपास दोन दशके भारतीय बाजारपेठेवर राज्य केले. ही बाईक तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि आकर्षक स्पोर्टी लुकसाठी ओळखली जाते. याचे उत्पादन बंद केल्यामुळे त्याचे चाहते खूपच निराश झाले आहेत, परंतु कंपनीने अलीकडेच या सेगमेंटमध्ये आणखी एक बाईक Pulsar P 150 लॉन्च केली आहे. यापूर्वी, कंपनीने या वर्षी पल्सर मालिकेतील पल्सर 180 आणि 2021 मध्ये पल्सर 220 बंद केली होती.
Bajaj Pulsar 150 Discontinued: भारतातील पल्सरचा प्रवास
बजाज ऑटोने 1980 आणि 90 च्या दशकात देशात आपल्या स्कूटरच्या विक्रीच्या दबदबा निर्माण केला होता. पण बाजारात परवडणाऱ्या 100 सीसी बाईक्स आल्याने लोक स्कूटरपेक्षा बाईक्स जास्त पसंत करू लागले. हे लक्षात घेऊन बजाजने आपली पल्सर सीरिज बाजारात आणली होती. ज्यामध्ये Pulsar 150 आणि Pulsar 180 लॉन्च करण्यात आले होते. दमदार इंजिन आणि आकर्षक स्पोर्टी लूकमुळे या बाईकने तरुणाईचे लक्ष वेधून घेतले.
पल्सर 150 ला वेळोवेळी अनेक नवीन अपडेट मिळाले आहेत. याच्या सुरुवातीच्या व्हर्जनला फक्त 12 bhp पॉवर देण्यात अली होती, त्याला 5-स्पीड गिअरबॉक्स मिळाला होता. 2003 मध्ये डिजिटल ट्विन स्पार्क इग्निशन म्हणजेच DTS-i तंत्रज्ञानाचा त्यात समावेश करण्यात आला. सध्या या पल्सर 150 चे इंजिन 14 पीएस पॉवर आणि 13.25 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकला फ्रंट व्हीलवर 260mm डिस्क ब्रेक, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह 17-इंच अलॉय व्हील आहेत.
दरम्यान, कंपनीने अलीकडेच आपली नवीन बाईक P 150 बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. ही बाईक Pulsar P150 सिंगल-डिस्क आणि ट्विन-डिस्क अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकच्या सिंगल डिस्क व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.16 लाख रुपये आहे. तर याच्या ट्विन-डिस्क व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.19 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.
इतर ऑटो संबंधित बातम्या:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI