Maruti Suzuki Festive Season Discount : नवरात्रीचा (Navratri 2022) सण येत्या 26 सप्टेंंबरपासून सुरु होणार आहे. त्या पाठोपाठ दसरा (Dussehra) आणि दिवाळीसुद्धा (Diwali) आहे. सण म्हटला की वस्तूंची खरेदी करणं आलंच. त्यामुळे ऑटोक्षेत्रातही अनेक हालचालींना वेग आला आहे. कारण या सीझनमध्ये वाहनांची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. तुम्ही सुद्धा नवीन पण बजेटफ्रेंडली कार घेण्याच्या विचारात आहात तर देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या वाहनांवर जोरदार डिस्काउंट ऑफर देत आहे. तुम्हीही लवकरच नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
मारुती सुझुकी वॅगन आर
मारुती सप्टेंबर महिन्यात या कारच्या स्वयंचलित आवृत्तीसाठी 34,000 रुपयांच्या ऑफर देत आहे, तर त्याच्या मॅन्युअल व्हर्जनसाठी 39,000 रुपयांची सूट मिळत आहे. या कारची देशात सर्वाधिक विक्री झाली आहे.
मारुती सुझुकी एस-प्रेसो
मारुतीच्या या कारची एक्स-शोरूम किंमत 4 लाख ते 5.99 लाख रुपये आहे. मारुती सप्टेंबर महिन्यात या कारच्या मॅन्युअल व्हेरियंटवर 49,000 रूपयांपर्यंत ऑफर देत आहे, तर त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 34,000 रुपयांची सूट मिळत आहे.
मारुती सुझुकी डिझायर
या महिन्यात, मारुती त्यांच्या डिझायर सेडान कारच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर 20,000 रुपये आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 40,000 रुपये सूट देत आहे. कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 88 Bhp पॉवर निर्माण करते.
मारुती सुझुकी सेलेरियो
मारुतीच्या या हॅचबॅक कारची किंमत 5.25 लाख ते 7 लाख रुपये आहे. या फेस्टिव्ह सीझन ऑफर अंतर्गत, कंपनी या कारच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर 49 हजार रुपयांपर्यंत आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासाठी 34,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
मारुती सुझुकी अल्टो 800
मारुती या कारच्या बेस एसटीडी वेरिएंट वगळता सर्व प्रकारांवर 29,000 रुपयांची सूट देत आहे. या कारमध्ये 800cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे सवलतीत 47 Bhp पॉवर जनरेट करते.
मारुती सुझुकी स्विफ्ट
मारुतीच्या या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिनचे पेट्रोल इंजिन बसवण्यात आले आहे. कंपनीला या कारच्या मॅन्युअल वेरिएंटसाठी 25,000 रुपये आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी 45,000 रुपयांच्या सूट ऑफर मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Hero Splendor : सर्वाधिक विकली जाणारी बाईक Hero Splendor Plus आता नवीन रंगात लॉन्च; 'ही' असेल किंमत
- Car : Ferrari Purosangue की Lamborghini Urus कोणती कार सर्वात भारी? वाचा A to Z माहिती
Car loan Information:
Calculate Car Loan EMI