AERWINS Technologies: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेली फ्लाइंग बाईक अखेर समोर आली आहे. जपानी स्टार्टअप कंपनी AERWINS  Technologies ने गुरुवारी आपली पहिली hoverbike Xturismo डेट्रॉईट अमेरिकेत सुरू असलेल्या ऑटो शोमध्ये सादर केली. ही फ्लाइंग बाईक पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बाईक पूर्णपणे बॅटरीवर चालणारी असून यावर फक्त एकच उक्ती प्रवास किंवा उड्डाण करू शकतो.


हॉवरबाईक बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 40 मिनिटे हवेत उडू शकते. या वेळेत ही बाईक सुमारे 100 किमी/ताशी वेगाने उड्डाण करू शकते. या उडणाऱ्या हॉवरबाईकचे वजन हलके ठेवण्यासाठी ही पूर्णपणे कार्बन फायबरपासून बनवली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दुचाकी उडवण्यासाठी चार छोटे आणि दोन मोठे रोटर बसवण्यात आले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, ही बाईक ड्रोन तंत्रज्ञानावर काम करते आणि टेकऑफ आणि लँडिंग अगदी सहज करू शकते. ही हॉवरबाईक जपानमध्ये आधीच विकली जात आहे. AERWINS चे संस्थापक आणि CEO Shuhei Komatsu यांनी सांगितले की, 2023 मध्ये अमेरिकेत एक लहान व्हर्जन विकण्याची योजना सुरू आहे. डेट्रॉईटमध्ये बाईक उडवणारे इन्स्पेक्टर थाड जोट म्हणाले की, ही बाईक उडवण्याचा अनुभव म्हणजे स्टार वॉर्समधील हॉवरबाईक उडवण्यासारखा आहे.


किंमत किती?


कंपनीने या हॉवरबाईकची अमेरिकेत किंमत 7,77,000 डॉलर्स निश्चित केली आहे. जी भारतीय चलनात अंदाजे 6 कोटी रुपये आहे. जरी कंपनीचा दावा आहे की, 2025 पर्यंत याचे छोटे युनिट देखील बाजारात आणले जाईल, ज्याची किंमत सुमारे 50,000 डॉलर्स असू शकते.


दरम्यान, आता जगभरातील अनेक कंपन्या फ्लाइंग कार आणि बाईक्स बनवत आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांना मोठी मागणी आहे. अलीकडे जेटसन वन, इटालियन स्टार्टअप कंपनी जेटसनची फ्लाइंग कार पूर्णपणे विकली गेली आहे. या कारला जगभरातील लोक पसंत करत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. जेटसन वन फ्लाइंग कार जमनीपासुन 1,500 फूट उंचीवर उडू शकते. ही उडणारी कार पूर्णपणे बॅटरीवर चालणारी आहे आणि एका पूर्ण चार्जवर ती 32 किमीपर्यंत उड्डाण करू शकते. ही कमाल 102 किमी/तास वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे. कंपनीने लॉन्च केल्यानंतर काही युनिट्सचे उत्पादन केले होते. ज्याची कंपनीने वर्षभरात विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु प्रचंड मागणीमुळे याचे सर्व युनिट्स पहिल्याच दिवशी विकले गेले.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI