Ferrari Purosangu vs Lamborghini Urus : सुपर लक्झरी कार निर्माता कंपनी फेरारीने (Ferrari) आपली लक्झरी कार पुरोसांग (Purosangu) युरोपीयन बाजारात लॉन्च केली आहे. या बाजारात या नवीन कारची किंमत 3.9 लाख युरो म्हणजेच जवळपास 3.1 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. फेरारीची ही पहिली एसयूव्ही आहे, जी अतिशय नवीन अपडेटेड व्हर्जनच्या स्वरूपात तयार करण्यात आली आहे. बाजारात ही कार लॅम्बोर्गिनी उरुसला (Lamborghini Urus) टक्कर देते. या दोन्ही एसयूव्हीची (SUV) किंमत खूप जास्त आहे. चला तर मग जाणून घेऊया दोन्हीपैकी कोणती कार सर्वोत्तम आहे.  


दोन्ही कारची स्पर्धा 


Lamborghini Urus SUV कंपनीने 2018 साली लॉन्च केली होती. तेव्हापासून या कारच्या 20,000 हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. या कारचे परफॉर्मन्स मॉडेल ड्रायव्हिंगसाठी अतिशय अनुकूल आणि अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीसह आहे. नवीन फेरारी पुरोसांग लाँच केल्यानंतर या कारला जबरदस्त स्पर्धा मिळण्याची अपेक्षा आहे. 


कोणत्या कारचे इंटीरियर चांगले आहे?


Urus Performante च्या इंटिरिअरला 'परफॉर्मंट' बॅजिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, सर्व कनेक्टिव्हिटी ऑप्शन सपोर्ट, एक मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम, काळ्या रंगाची अलकंटारा सिंथेटिक अपहोल्स्ट्रीसह स्पोर्टी लूक मिळतो. या कारमध्ये अनेक एअरबॅग्स आढळतात.


पुरोसांगच्या केबिनमध्ये 10.25-इंचाचे इन्फोटेनमेंट पॅनल, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, इलेक्ट्रोक्रोमिक ग्लास रूफ, प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्री यांसारखी फिचर्स आहेत. या कारमध्ये अनेक एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. 


कोणत्या कारचा लूक आकर्षक?


लॅम्बोर्गिनी उरुस परफॉर्मन्स एसयूव्हीला ब्लॅक-आउटसह मोठे 22/23-इंच अलॉय व्हील, एअर व्हेंट्स आणि कार्बन फायबर हूडसह रॅप-अराउंड Y-आकाराचे एलईडी टेललॅम्प, नवीन आकाराचे बंपर आणि DRL सह स्वेप्ट-बॅक एलईडी हेडलाइट्स पाहायला मिळतात. .


दुसरीकडे, फेरारी पुरोसांगला चार एक्झॉस्ट टिप्स, डिझायनर अलॉय व्हील, रेक्ड (फ्लॅट) विंडस्क्रीन, सुसाईड डोअर्स, स्प्लिट-प्रकार DRL सह एलईडी हेडलाईट्स, स्लोप डिझाईन रूफ, मस्क्यूलर बोनेट, मोठी लोखंडी जाळी आणि अरुंद एलईडी टेललाईट्स मिळतात.


कोणाचे इंजिन अधिक पॉवरफुल आहे?


Urus परफॉर्मन्स 4.0-L ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 इंजिन वापरते जे 666bhp कमाल पॉवर आणि 850Nm पीक टॉर्क निर्माण करते. हे 8-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले स्वयंचलित टॉर्क-कन्व्हर्टर युनिट वापरते. 


पुरोसांग हे अतिशय शक्तिशाली 6.5-L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड V12 इंजिनद्वारे समर्थित आहे जे 715bhp च्या कमाल पॉवर आउटपुटसह 716 Nm पीक टॉर्क निर्माण करते. यात 8-स्पीड डीसीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 


किंमत किती?


जर आपण किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Lamborghini Urus Performant ची किंमत US मध्ये $2.6 दशलक्ष म्हणजे सुमारे 2.07 दशलक्ष भारतीय रुपयांत आहे. तर, फेरारी पुरोसांगची युरोपियन बाजारात किंमत 3.9 लाख युरो म्हणजे सुमारे 31 दशलक्ष भारतीय रुपये आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI