Hero Splendor Plus in New Colour : Hero MotoCorp या सर्वात प्रसिद्ध दुचाकी वाहक कंपनीने एक नवीन अपडेट समोर आणले आहे. Hero MotoCorp या दुचाकी बाजारपेठेतील भारतातील आघाडीच्या कंपनीने स्प्लेंडर प्लस (Splendor Plus) ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी बाईक सिल्व्हर नेक्सस ब्लू कलरमध्ये बाजारात आणली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 70,658 रुपये आहे. तसेच, अपडेटेड कलर ऑप्शननंतर ही बाईक आता एकूण सहा कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.  


सर्वाधिक विकली जाणारी बाईक : 


Hero Splendor Plus आता हेवी ग्रे विथ ग्रीन, ब्लॅक विथ सिल्व्हर, मॅट शील्ड गोल्ड, ब्लॅक विथ स्पोर्ट्स रेड, ब्लॅक विथ पर्पल, सिल्व्हर नेक्सस ब्लू अशा सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये कलर व्यतिरिक्त बाकी सर्व काही सारखेच आहे. भारतात दर महिन्याला या बाईकचे सरासरी 2.5 लाख युनिट्स विकले जातात.   


हिरो स्प्लेंडर प्लस इंजिन (Hero Splendor Plus Engine) :


हिरोची कम्युटर बाईक 97.2cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनवर आधारित आहे. जी 8,000 rpm वर 7.9 bhp ची कमाल पॉवर आणि 6,000 rpm वर 8.05 Nm चा हाय टॉर्क निर्माण करते. i3S आयडियल स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह बाईक 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. 


कसे असतील Hero Splendor बाईकचे फिचर्स (Hero Splendor Plus Features) :


या बाईकच्या दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्स दिसत आहेत, तसेच स्प्लेंडरमध्ये इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीमही देण्यात आली आहे. या बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल स्प्रिंग-लोडेड रियर शॉक ऍब्जॉर्बर देण्यात आले आहेत. 


Hero Splendor बाईकची किंमत किती? (Hero Splendor Plus Price) :


Hero Splendor Plus ची देशातील सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 70,658 रुपये आहे, तर त्याचे हाय एंड व्हेरिएंट 72,978 रुपयांना उपलब्ध आहे. अलीकडे ही बाईक Hero Splendor XTEC या नवीन हायटेक व्हर्जनमध्ये सादर करण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI