महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक कारच्या रेकॉर्डब्रेक विक्री मागे काय आहेत कारणे?
Electric Car : इलेक्ट्रिक कारच्या विक्रीमध्ये महाराष्ट्र राज्यने संपूर्ण भारतात दुसरा नंबर पटकावला आहे. डिसेंबरमध्ये भारतात सर्वाधिक इलेक्ट्रीक कारची विक्री झाल्याचे एका हवालात स्पष्ट झाले आहे.
Electric Car : इलेक्ट्रिक कारच्या विक्रीमध्ये महाराष्ट्र राज्यने संपूर्ण भारतात दुसरा नंबर पटकावला असून डिसेंबरमध्ये संपूर्ण भारतात सर्वाधिक इलेक्ट्रीक कारची विक्री झाल्याचे एका संस्थेच्या हवालात स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक कारच्या रेकॉर्डब्रेक विक्रीच्या मागे काय कारणे आहेत जाणून घेऊयात...
जे एम के रिसर्च अँड अनलिटिक्स या संस्थेचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यात संपूर्ण भारतात झालेल्या इलेक्ट्रिक कारच्या विक्रीचा आकडा प्रकाशित करण्यात आला आहे. पूर्ण भारतात डिसेंबर 2021 मध्ये तब्बल पन्नास हजाराहून जास्त इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झाली आहे आणि या विक्रीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्याचा नंबर आहे.
डिसेंबर 2021 या एका महिन्यात झालेल्या इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री - 50,866 गाड्या
सर्वाधिक गाड्या - उत्तर प्रदेश, 23 टक्के
दुसऱ्या क्रमांकावर - महाराष्ट्र, 13 टक्के
तिसऱ्या क्रमांकावर - कर्नाटक, 9 टक्के
भारतात पहिल्यांदाच एका महिन्यात 50 हजार पेक्षा जास्त इलेक्ट्रिक गाड्या विक्री झाल्या आहेत. या विक्रीमध्ये तब्बल 240 टक्क्यांची वाढ झाल्याचे जे एम के या अहवालात म्हटले आहे. या 50 हजार 886 गाड्यांपैकी 2 हजार 522 या चार चाकी गाड्या आहेत. त्यात सर्वाधिक पसंती टाटा समूहाच्या गाड्यांना प्रवाश्यांनी दिली आहे. एकूण गाड्यांच्या विक्री मध्ये टाटा कंपनीच्या 93 टक्के गाड्या आहेत. त्या खालोखाल एम जी कंपनी आहे.
चार चाकी गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांना नागरिकांनी जास्त पसंती दर्शवली आहे. डिसेंबर महिन्यात तब्बल 24 हजार 725 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री देशभरात झाली आहे. ज्यात हिरो इलेक्ट्रिक आणि ओकिनावा या दोन कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी आघाडीवर आहेत. याचसोबत इलेक्ट्रिक तीन चाकी आणि इलेक्ट्रिक बसचा खप देखील वाढलेला या अहवालात दिसून आला आहे. ज्यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे.
राज्य सरकारने इलेक्ट्रिक वेहिकल खरेदी करणाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना FAME 2 योजनेअंतर्गत 15,000 रुपयांपर्यंत अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह, 10,000 रुपयांचे राज्य अनुदान, 7,000 रुपयांचे स्क्रॅपिंग बेनिफिट आणि 12,000 रुपयांची सब्सिडी मिळेल. राज्य सरकार 2025 पर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि सोलापूर या 7 शहरांत सार्वजनिक आणि निम सार्वजनिक चार्जिंग सुविधा उभारणार आहे. रस्ते कर आणि नोंदणी शुल्कातून इलेक्ट्रीक व्हेईकल्सना माफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. महत्वाच्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना राजेंद्र देण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाकडून मिळालेले आहेत. तसेच प्रत्येक पेट्रोल पंपावर चार्जिंगची सुविधा देण्याचे आदेश देखील जारी करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या या सर्व योजना मुळेच सध्या महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रीक कारची विक्री नवीन उच्चांक गाठत आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक गाड्या असलेले राज्य होईल यात शंका नाही.