भारीच नाही तर जबरदस्त आहे C5 Aircross एसयूव्ही, जाणून घ्या संपूर्ण माहिती
C5 Aircross Review: फ्रेंच कार निर्मात्या कंपनी आपली नवीन कार Citroen C3 लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे.
C5 Aircross Review: फ्रेंच कार निर्माता कंपनी आपली नवीन कार Citroen C3 लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र आज आपण कंपनीने मागच्या वर्षी भारतात लॉन्च केलेली पहिली एसयूव्ही Citroen C5 Aircross बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही कार पूर्णपणे फ्रान्समध्ये तयार करण्यात आली असून इतर एसयूव्हीच्या तुलनेत ही खूपच वेगळी आहे. भारतात याची किंमत 32 लाख रुपये आहे. ही पूर्णपणे पैसा वसूल कार आहे. जे ग्राहक अधिक टिकाऊ आणि मजबूत एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहे, त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.
ही एसयूव्ही भारतात लॉन्च होऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. मात्र भारतीय रस्त्यानावर ही कार अधिक दिसत नाही. नेहमीच्या SUV डिझाइन टेम्पलेटपेक्षा ही C5 Aircross वेगळी आहे. या कारचा लूक ही दिसायला चांगला आहे. ही कार आकाराने फार मोठी नाही आणि लहानही नाही. ही एक मध्यम आकारची एसयूव्ही आहे. याची ग्रील दिसायला आकर्षक आहे.
C5 Aircross मध्ये 8-इंचाची टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिली आहे, जी Apple CarPlay आणि Android Auto सह येते. याशिवाय, यात ड्युअल टोन डॅशबोर्ड फिनिश देखील मिळेल जे त्याच्या लुकला स्पोर्टी टच देते. नवीनतम फीचर्स म्हणून या कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ, 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ग्रिप कंट्रोल सिस्टम, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, ड्युअल टोन 18-इंच डायमंड कट अलॉय व्हील, ड्रायव्हर सीट मसाजर सारखे जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे. यात 18 इंचाचे अलॉय व्हील देण्यात आले आहे.
या एसयूव्हीचा आतील भाग पूर्णपणे वेगळा आहे. ही कार खऱ्या अर्थाने आलिशान आहे. याच्या आतील भागात लेदर/क्लॉथ कॉम्बोसह कंटाळवाणा बेज सेटअप नाही. टचस्क्रीन आणि इन्फोटेनमेंट सिस्टम चांगले काम करतात, पण यात आणखी काही फिजिकल कंट्रोल देण्यात आले असते तर छान झालं असत. ड्रायव्हर डिस्प्ले पूर्ण डिजिटल आहे, जे अपेक्षित आहे.
Citron C5 Aircross SUV मध्ये 2.0-लिटर चार-सिलेंडर डिझेल इंजिन आहे. जे 3,750rpm वर 174bhp पॉवर आणि 2,000rpm वर 400Nm टॉर्क जनरेट करते. तसेच यात ट्रान्समिशनसाठी 8-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर देण्यात आला आहे. चांगल्या ड्राइव्ह अनुभवासाठी, C5 एअरक्रॉस चार पकड ग्रीप मोड देण्यात आले आहे. ज्यात स्टँडर्ड, स्नो, ऑल-टेरेन आणि सँडचा समावेश आहे.