Kia Carens Bookings  : किआ कार कंपनीने मागील काही वर्षात भारतात गाड्या लाँच करण्यास सुरुवात केली. सोनेट, सेल्टॉस अशा काहीच गाड्या कंपनीने आतापर्यंत बाजारात आणल्या असल्या असून आता चौथी कार किआ केरेन्स कंपनीने नुकतीच सर्वांसमोर आणली. किआ केरेन्स (Kia Carnes) ची प्री-लॉन्च बुकिंग नुकतीच 14 जानेवारी, 2022 रोजी पार पडली.  यावेळी ग्राहकांनी तुफान प्रतिसाद दिल्याने अवघ्या एका दिवसांत तब्बल 7 हजार 738 गाड्या बुक झाल्या. कंपनीने 25,000 रुपये किंमत भरून ही कार बूक करण्याची संधी ग्राहकांना दिली होती. या संधीचा ग्राहकांनी पूर्ण फायदा घेतल्याचे यावेळी दिसून आहे.


किआ इंडियाने लॉन्च केलेली ही किआ केरेन्स कंपनीच्या सेल्टॉस या गाडीवर आधारीत असली तरी तिचं डिझाईन काहीसं वेगळं आहे. गाडीत आरामदायी इंटेरियर, स्मार्ट कनेक्टिव्हीटी फिचर्स, बोल्ड डिझाईन आणि बसणाऱ्यांसाठी आरामदायी जागा अशा सुविधा असणार आहेत. तर या नव्या केरेन्सच्या काही वैशिष्ट्यांवर एक नजर...


किआ कॅरेन्सची वैशिष्ट्ये


* किआ कॅरेन्समध्ये 10 बळकट उच्च सुरक्षा पॅकेज आहेत.


* 6 एयरबॅग, प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस या सर्व पाच प्रकारांमध्ये प्रमाणित आहे. 


* व्हेईकलमध्ये 66 कनेक्टेड कार फिचर्स सह किआ कनेक्टच्या माध्यमातून अत्याधुनिक कनेक्टीव्हीटी आहे.


* सर्वात लांब व्हीलबेससह पॉवरट्रेन्स आणि ट्रान्समीशन पर्यायांची निवड सुद्धा आहे. 


* व्हेईकलमध्ये बरेच सर्वोत्तम फिचर्स आहेत जसे की, 


नेक्स्ट जनरेशन किआ कनेक्टसह 26.03 सेमी (10.25”) एचडी टचस्क्रीन नेव्हीगेशन, 


8 स्पीकरसह बोस प्रीमियम साऊंड सिस्टीम, व्हायरस आणि बॅक्टेरीयापासून संरक्षण देणारे एयर प्युरिफायर, हवेशीर समोरील सीट, 


2 ओळीतील सीट "वन टच इझी इलेक्ट्रीक टंबल" आणि स्कायलाईट सनप्रुफ. 


किआ कॅरेन्स तीन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये येईल - स्मार्टस्क्रीम 1.5 पेट्रोल, स्मार्टस्ट्रीम 1.4 T-GDi पेट्रोल, 


1.5 CRDi VGT डिझेल जे तीन ट्रान्समीशन पुढील पर्यायांमध्ये येते - 6MT, 7DCT आणि 6AT.


हे ही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI