Skoda Octavia Features: स्कोडाप्रेमी अजूनही स्कोडाचीच गाडी घेण्यास आग्रही असतात याचं मुख्य कारण सेडानने अजूनही बाजारात आपली ओळख टिकवून ठेवली आहे. सेडानकडे क्लासिक शेप आहे. स्कोडाकडे ऑक्टेविया ही एक स्पेशल आणि पहिली कार आहे जी काही वर्षांपूर्वी भारतात लॉन्च झाली होती. कित्येक लोकांसाठी स्कॉडा म्हणजेच ऑक्टेविया हे समीकरण तयार झालं आहे.आता हीच ऑक्टेविया आता नवीन रूपात आणि आकर्षक अशा फीचर्ससहित भारतात लॉन्च झाली आहे. नवीन ऑक्टेविया कारची किंमत 26 लाख रुपयांपासून सुरु होऊन पुढे आकर्षक अशा सुविधांमध्ये ही कार 29.29 लाखांपर्यंत बाजारात उपल्बध आहे. 




स्कॉडा ऑक्टेवियाचे फीचर्स -
नवीन कोरी करकरीत ऑक्टेविया शानदार तर दिसतेच पण आता ती जास्त मोठी, रूंदीने जाड आणि खूप सुविधा असणारी आहे. या गाडीची लांबी 4,689 मिमी आहे जी सेडानच्या आकाराइतकी आहे. मोठ्या क्रोम आणि स्लिम एलईडी हेडलॅम्प्सबरोबर मुख्य लूकसुद्धा नवीन आहे. 17 इंचाचे शार्प अलॉय आणि बाजूला क्रिस्प लाऊन्स गाडीला एक आकर्षक लूक दिला आहे ज्यामुळे ती दिसायलाही महाग वाटते. 



  • कोणत्याही स्कॉडा गाडीप्रमाणेच यासुद्धा गाडीची बिल्ड क्वालिटी चांगली आहे. या गाडीचा ले-आऊट फारच स्वच्छ आणि सुंदर दिसतोय. मागच्या जनरेशच्या ऑक्टेवियाशी या गाडीची तुलना केल्यास यामध्ये मटेरियलची क्वालिटी फारच अप्रतिम आहे. 

  • या गाडीची डिजिटल टेक्लॉलॉजी ही अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे. या गाडीमध्ये तुम्हाला भरपूर डिव्हाईस मिळतील ज्यामध्ये लॉरिन आणि क्लेमेंट 12 स्पीकरची लेटेस्ट ऑडिओ सिस्टीम आहे. 2 झोन क्लायमेट कंट्रोल , 4 यूएसबी सी पोर्ट, रोलर सन ब्लाइंड्स, आकर्षक अशी लायटिंग, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिवीटी, लेदरच्या सीट्स अशा बऱ्याच सुविधा आहेत. 

  • मागच्या जनरेशनच्या ऑक्टेवियाच्या तुलनेत यामध्ये जास्त आणि आरामदायी जागा आहे. या गाडीमध्ये 600 लीटरच्या लगेजची जागा आहे. मागच्या सीटांना फोल्ड केल्यानंतर 1,555 लीटर लगेज जागा आहे. आठ एयरबैग, iBuzzआराम अलर्ट आणि AFS (एडेप्टिव फ्रंट-लाइटिंग सिस्टम) प्लस एक टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि  MySKODA कनेक्शन अॅपसुद्धा आहे. 

  • ऑक्टेविया आता डिझेल नाही तर टर्बो पेट्रोलसह उपलब्ध आहे. इंजिन 190PS आणि 320Nm बरोबर 2.0 लीटर टर्बो पेट्रोल आहे. स्टैंडर्ड गियरबॉक्स एक 7-स्पीड डुअल क्लच ऑटोमैटिक आहे. ऑक्टेविया ही एक स्मूथ लग्जरी गाडीसारखी सुरू होते ज्यामुळे मुंबईच्या गच्च ट्रॅफिकच्या रस्त्यांवरून जाणं अधिक सोयीचं होतं. आकर्षक आणि आरामदायी अशा ऑक्टेविया गाडीचं मायलेज 10kmplआहे. 


हे ही वाचा - 


CES 22 Top Gadgets : रंग बदलण्याऱ्या कारनं वेधलं लक्ष, टेक-गॅजेटच्या कुंभमेळ्यातील थक्क करणारे टॉप गॅजेट्स


Amazon Deal : मुफ्त, मुफ्त, मुफ्त.... दोन दिवस बॅटरी लाईफ असलेला Redmi स्मार्टफोन खरेदी करा अगदी मोफत; जाणून घ्या काय आहे स्कीम


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI