मुंबई : ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने ऑडी ए4 चे नवे व्हेरियंट ऑडी ए4 प्रीमियमच्या लाँचची घोषणा केली आहे. ऑडी ए4 च्या या पाचव्या जनरेशनमध्ये नवीन डिझाइन आणि शक्तिशाली 2.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे. जे 190 हॉर्स पावर आणि 320 एनएम टॉर्कची निर्मिती करते. या नव्या ऑडी ए4 प्रीमियमची सुरुवाती किंमत 39 लाख 99 हजार रूपये (EX Showroom Price) इतकी आहे. 


ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ऑडी ए4 ला जानेवारीमध्ये लाँच केल्यापासून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ही कार ब्रॅण्डसाठी ऐतिहासिक दृष्ट्या सर्वोच्च विक्री करणारी ठरली आहे.  त्यामुळे आता या नव्या ब्रॅण्डच्या यशाला साजरे करण्यासाठी नवीन व्हेरियंट ‘ऑडी ए4’ प्रीमियम सादर करत आहोत. ग्राहकांना आणखी नव्या प्रकारे ऑप्शन उपलब्ध करुन देण्यासारखा दुसरा आनंद नाही."


ऑडी ए4 प्रीमियमचे खास फिचर्स



  • एलईडी हेडलाइट्ससह सिग्नेचर डेटाइम रनिंग लाइट्स

  • एलईडी रिअर कॉम्बीनेशन लाइट्स

  • ग्लास सनरूफ

  • ऑडी साऊंड सिस्टिम

  • ऑडी स्मार्टफोन इंटरफेस

  • ऑडी फोनबॉक्स लाइटसह वायरलेस चार्जिंग

  • पार्किंग आणि रिअर व्ह्यू कॅमेरा

  • 25.65 सेमी सेंट्रल एमएआय टचस्क्रिन

  • ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टिमसह कलर डिस्प्ले

  • 6 एअरबॅग्ज

  • इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्स

  • इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल, ऑटो फोल्डिंग आणि हिटेड एक्स्टीरियर मिरर्ससह अॅण्टी-ग्लेअ


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




Car loan Information:

Calculate Car Loan EMI