किआ नवीन कार (Kia New Car): जर तुम्ही किआच्या (Kia)गाड्यांसाठी हौशी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. किआ पुढच्याच महिन्यात भारतात आपलं नवं मॉडेल Carens लॉन्च करणार आहे.  Carens एक RV आहे, ज्यामध्ये MPV आणि SUV चे मिश्रण आहे. १४ जानेवारीपासून या कारची बुकिंग सुरू होणार आहे. नुकतीच केरेंन्सच्या नव्या प्रकाराबद्दल काही माहिती समोर आली आहे. भारतात केरेंन्स कार 5 प्रकारांत उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रीमीयम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लग्जरी आणि लग्जरी प्लस यांचा समावेश आहे. हे सगळे प्रकार जास्त बेस ट्रिमच्या बरोबर चांगल्या पद्धतीने आणि 6 एअरबॅगसहित येतील. चला तर जाणून घेऊयात कोणत्या प्रकारात नेमके खास काय असणार आहे. 


1.प्रीमियम (Premium)
किआ केरेन्सचा सुरुवातीचा प्रकार प्रीमियम असेल. यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग, ऑल व्हील डिस्क ब्रेक, सेकंड रो इलेक्ट्रिक टच टंबल ऑपरेशन, डिजिटल यंत्र क्लस्टर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमसहित अजूनही बरंच काही. 


2. प्रेस्टिज (Prestige)
या प्रकारांत तुम्हाला प्रीमियमचे फीचर्स तर मिळतीलच पण त्याचबरोबर तुम्हाला एक मोठा डिजिटल डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीसहित एक टचस्क्रिन, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर आणि एक 6-स्पीकर ऑडियो सिस्टमसुद्धा मिळेल. 


3. प्रेस्टिज प्लस (Prestige Plus)
या प्रकारात आधीचे फीचर्सही मिळतील त्याचबरोबर तुम्हाला एलॉय व्हील्स, रियर वॉशर/वाइपर, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल आणि अजूनही बरंच काही. 


4. लग्जरी (luxury) और लग्जरी प्लस (luxury Plus)
किआ केरेन्सच्या या टॉपच्या प्रकारांत तुम्हाला सुरुवातीचे फीचर्स तर मिळतीलच त्याचबरोबर ओटीएसहित 10.25 इंचाची टचस्क्रीन, कनेक्टेड टेक्नोलॉजी, 64 कलर एम्बिएंट लाइटिंग, फुल लेदर सीट आणि गाडीच्या मागच्या प्रवाशांसाठी टेबलची सुविधाही उपलब्ध असेल. एवढेच नाही, या प्रकारांत एक सनरूफ, हवेशीर जागा, वायरलेस चार्जिंग आणि 8-स्पीकर बोस प्रीमियम ऑडियो सिस्टमसुद्धा मिळणार आहे. 


इंजिनची स्थिती
केरेंन्स Carens दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल युनिट इंजिनसहित चालेल. ज्यामध्ये 1.4 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेलच्या बरोबर ऑटोमेटिक ऑप्शनसुद्धा उपलब्ध होतील. 1.5 लीटर पेट्रोल केवळ मेन्युअल गियरबॉक्ससहित येतील. केरेन्स (Carens) भारतात लॉन्च होणारी किआ ही चौथी कार असेल.


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


[yt][/yt]


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI