Skoda Kodiaq Facelift : कार निर्माता कंपनी स्कोडा (Skoda) ने त्याचे कोडियाक कार (Skoda Kodiaq Facelift) लाँच केली आहे. कंपनीने त्याच्या बेस मॉडेलची किंमत (Skoda Kodiaq Facelift Price) 34.99 लाख रुपये केली आहे. जे टॉप मॉडेलसाठी 37.49 लाख रुपये (Ex-showroom) पर्यंत जाते. लाँच व्यतिरिक्त कंपनीने प्रीमियम एसयूव्ही (SUV) चे बुकिंग देखील सुरु केले आहे.


येत्या काही दिवसांत त्याची डिलिव्हरीही लवकरच सुरू होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की या एसयूव्हीचे हे पुनरागमन आहे, सुमारे दोन वर्षांपूर्वी बीएस 6 नॉर्म्समुळे ती बाजारातून बाहेर काढली गेली होती. मात्र, आता कंपनीने ती पुन्हा बाजारात लाँच केली आहे. कोडियाक फेसलिफ्ट ही स्कोडाची भारतात या वर्षीची लाँच होणारी पहिली कार आहे. Skoda Kodiaq Facelift मध्ये अनेक अपडेट्ससह आले आहेत.


कोडियाक फेसलिफ्ट कारमध्ये 2.0 लिटर, चार-सिलेंडर TSI टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. जे 190PS पॉवर आणि 320Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ऑल-व्हील ड्राईव्ह एसयूव्हीच्या सर्व प्रकारांमध्ये उत्तम आहे. ही SUV अतिशय पॉवरफुल आहे.


वैशिष्ट्ये
कोडियाक फेसलिफ्ट आऊटगोइंग मॉडेलमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये डायनॅमिक चेसिस कंट्रोल देण्यात आले आहे. यात गरम आणि थंड झालेल्या फ्रंट सीट्स, वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, वायरलेस चार्जिंग पॅड आणि 12-स्पीकर कँटन साऊंड सिस्टम सारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये देखील मिळतात, ज्यामुळे ही SUV खास आहे.


नऊ एअरबॅगसह सुरक्षित ड्राईव्ह
या एसयूव्हीमध्ये नऊ एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. हे सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्कृष्ट आहे. याशिवाय, तुम्हाला कारच्या आतील भागात 8.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अॅम्बियंट लाइटिंग, थ्री-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये मिळतात.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI