Hyundai Grand i10 NIOS : Hyundai ने Grand i10 NIOS कॉर्पोरेट एडिशन लॉन्च केले आहे. लॉन्च केलेले हे मॉडेल मॅग्ना ट्रिमवर आधारित आहे. ज्यामध्ये काही इंटर्नल आणि एक्सटर्नल सुधारणा आहेत. नवीन व्हेरिएंटला नवीन टेक्नॉलॉजीने अपडेट केले आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन मिररिंगद्वारे नेव्हिगेशनसह 6.75 इंच टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि मानक म्हणून एलईडी टर्न इंडिकेटरसह इलेक्ट्रिक फोल्डेबल orvm यांचा समावेश आहे. 


कारच्या एक्सटर्नल पार्टबद्दल बोलायचे झाल्यास, Hyundai Grand i10 NIOS कॉर्पोरेट एडिशनला 15-इंच गनमेटल स्टाईल व्हील, ब्लॅक-पेंटेड ORVM, कॉर्पोरेट चिन्ह, ग्लॉसी ब्लॅक रेडिएटर ग्रिल आणि कारच्या मागच्या बाजूस क्रोम फिनिश मिळते.


Grand i10 NIOS चे फीचर्स : 


Grand i10 NIOS कॉर्पोरेट एडिशनला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. कारच्या सीट्स ऑल-ब्लॅक इंटीरियरमध्ये डिझाईन केलेल्या आहेत. गीअर बूट आणि एसी व्हेंट्सवर रेड कलर इन्सर्ट देण्यात आला आहे. ग्रँड i10 NIOS कॉर्पोरेट एडिशन हे 1.2-लिटर पेट्रोल इंजिनद्वारे आहे जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शनशी जोडलेले आहे. यातील इंजिन 82 bhp पॉवर आणि 114 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. 


कारची किंमत किती?


Hyundai i10 NIOS ची किंमत 5.39 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.46 लाख रुपयांपर्यंत जाते. Hyundai i10 NIOS देखील कंपनी फिटेड CNG सह येते. ज्याची किंमत 7.16 लाख रुपये आहे. येथे नमूद केलेल्या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एक लिटर पेट्रोलमध्ये ते 20 किमी, तर एक किलो सीएनजीमध्ये 25 किमीपर्यंत जाऊ शकते. Grand i10 NIOS च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास मॅन्युअल ट्रान्समिशनची किंमत 6,28,900 लाख रुपये आहे. तर, ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची किंमत 6,97,700 रुपये आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI