KTM New BIke: प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी केटीएमने भारतात आपली नवीन RC 390 नेक्स्ट जनरेशन बाईक लॉन्च केली आहे. आउटगोइंग मॉडेलच्या तुलनेत नवीन 2022 KTM RC 390 मधील सर्वात मोठा बदल हा डिझाइनमध्ये करण्यात आला आहे. या नवीन बाईकच्या दोन्ही बाजूला LED DRL-कम-इंडिकेटर्ससह नवीन फ्रंट फेअरिंगमध्ये एक मोठा एलईडी हेडलॅम्प देण्यात आला आहे. 


फीचर्स 


RC 390 मध्ये एक मोठा visor, नवीन मिरर, मोठी 13.7-लिटर इंधन टाकी, नवीन स्प्लिट सीट, तसेच अगदी नवीन स्पोर्टी दिसणारी अलॉय व्हील्स देखील मिळतात. KTM नवीन RC 390 दोन पेंटमध्ये ऑफर करत आहे - KTM फॅक्टरी रेसिंग ब्लू आणि KTM इलेक्ट्रॉनिक ऑरेंज. KTM ने दावा केला आहे की, नवीन RC 390 ला 'ग्रँड प्रिक्स प्रेरित इलेक्ट्रॉनिक्स' ची रेंज मिळते. ज्यात बाईक ट्रॅक्शन कंट्रोल (MTC), QuickShifter+, लीन-एंगल सेन्सिटिव्ह कॉर्नरिंग ABS आणि सुपरमोटो मोडचा समावेश आहे. इतर फीचर्समध्ये केटीएम माय राइडसह टीएफटी डिस्प्ले, पॉवर-असिस्टेड अँटी-हॉपिंग स्लिपर क्लच, 2-स्टेप हाईट अॅडजस्टेबल हँडलबार, तसेच ऑल-एलईडी लाइटिंगचा समावेश आहे.


किंमत 


RC 390 ची ही 2022 आवृत्ती मागील-जनरल मॉडेलच्या तुलनेत सुमारे 37,000 रुपयांनी अधिक महाग ठेवण्यात आली आहे. याची किंमत 3.14 लाख रुपये (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) आहे.


इंजिन 


2022 RC 390 पूर्वीप्रमाणेच 373 cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर DOHC इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 43.5 PS पॉवर आणि 37 Nm टॉर्क जनरेट करते आणि 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, टॉर्क डिलिव्हरी मागील मॉडेलच्या तुलनेत सुधारली आहे. यात नवीन 40% मोठे एअरबॉक्स देण्यात आले आहे.


2022 KTM RC 390 नवीन इंजिनीयर्ड बोल्ट-ऑन सबफ्रेमसह ट्यूबलर स्प्लिट-ट्रेलीस फ्रेमवर बनवली गेले आहे. ब्रेकिंग ड्युटी BYBRE डिस्क ब्रेकद्वारे घेतली जाते आणि त्यात ड्युअल चॅनल ABS देण्यात आला आहे. नवीन-जनरल RC 390 चे ग्राउंड क्लीयरन्स 153 मिमी आहे आणि याचे वजन 172 किलो आहे. तर सीट 835 मिमी उंचीवर सेट केली गेली आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI