2022 Hyundai Tucson: Hyundai Motor लवकरच आपली प्रीमियम SUV Tucson चे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लॉन्च करणार आहे. Hyundai ने जागतिक बाजारपेठेत आधीच सादर केलेली ऑल-न्यू Tucson भारतीय बाजारपेठेत या वर्षाच्या पुढील सहामाहीत लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. चौथ्या पिढीतील टक्सन एसयूव्ही फोक्सवॅगन टिगुआन (Volkswagen Tiguan), स्कोडा कुशाक  (Skoda Kushaq) आणि या सेगमेंटमधील इतर एसयूव्हीशी स्पर्धा करणार आहे. 2022 Hyundai Tucson मोठ्या बदलांसह सादर करण्यात आली आहे. नवीन SUV पाहून तुम्हाला समजेल की कंपनीने सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत यात किती बदल केले आहेत.


नवीन SUV सध्याच्या मॉडेलपेक्षा दिसण्यात अधिक स्पोर्टी आहे. याची नवीन फ्रंट ग्रिल आणि शार्प एलईडी हेडलाइट्स याची सुंदरता आणखी वाढवते. नवीन एसयूव्हीचा केवळ पुढचा आणि मागील भागातच नाही, तर साईड बाजू देखील मजबूत आहे. स्वीप्ट बॅक रूफलाइन काळ्या कॉन्ट्रास्टमध्ये दिलेली आहे. त्याच्या मागील बाजूसही मोठे बदल करण्यात आले आहेत आणि सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत ते दिसायला खूपच आकर्षक आहे. या SUV मध्ये बंपरवर डायमंड टेक्सचर आणि मागील स्पॉयलरने झाकलेले वायपर मिळते.


फीचर्स आणि इंजिन 


Hyundai Tucson फेसलिफ्टमध्ये नवीन 10.25-इंच फुल टचस्क्रीन, मल्टी-एअर व्हेंटिलेशन सिस्टीम आणि एक्स्पोज्ड हुडलेस डिजिटल गेज क्लस्टरसह अनेक नवीन फीचर्स देण्यात आली आहेत. यात 2.5-लीटर पेट्रोल आणि 1.6-लिटर टर्बो हायब्रिड इंजिन नवीन टक्सनसह उपलब्ध होणार आहेत. कंपनीने हे इंजिन पर्याय 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज केले आहेत. SUV चे शक्तिशाली इंजिन 187 Bhp पॉवर आणि 246 Nm पीक टॉर्क बनवते. तर याचे टर्बो इंजिन 226 Bhp पॉवर आणि 264 Nm पीक टॉर्क जनरेट करते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


ठरलं! 'या' दिवशी लॉन्च होणार नवीन Mahindra Scorpio N; मिळणार 10 जबरदस्त फीचर्स
जबरदस्त लूक आणि ड्युअल ABS सह नवीन KTM RC 390 लॉन्च; दमदार फीचर्ससह किंमत आहे


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI