Accelero+: भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे बाजार आता आणखी मोठे होता चालेल आहे. अनेक प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनींसह बऱ्याच स्टार्टअप्स कंपन्याही आपली उत्पादने भारतीय बाजारात सादर करताना दिसत आहे. बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरचे बरेच प्रकार उपलब्ध असल्याने याचा मोठा फायदा भारतीय ग्राहकांना होत आहे. अशातच स्टार्टअप्स कंपनी NIJ Automotive ने आपली नवीन Accelero+ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर आपल्या ड्युअल एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि बूमरॅंग-शैलीतील एलईडी इंडिकेटरमुळे वेगळी दिसते. ग्राहकांना ही स्कूटर इम्पीरियल रेड, ब्लॅक ब्युटी, पर्ल व्हाइट आणि ग्रे टच कलर्समध्ये खरेदी करता येईल.


Accelero+ मध्ये क्रूझ कंट्रोल सारखे जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या राइडिंगसाठी हे फीचर्स उपयुक्त ठरणार आहे. हे इलेक्ट्रिक स्कूटर चार बॅटरी कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये लीड-ऍसिड बॅटरी आणि 3 LFP बॅटरी पॅक समाविष्ट आहे. यात ड्युअल बॅटरी सेटअपसह 1.5 Kw (48V), 1.5 Kw (60V) आणि 3 Kw 48V LFP बॅटरीचे पर्याय देण्यात आले आहे. 


किंमत 


Accelero+ स्कूटर इको मोडमध्ये 190 किमीचा पल्ला गाठू शकते. यात तीन राइड मोड देण्यात आले आहे. ही स्कूटर ड्युअल एलएफपी बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. सिटी मोडमध्ये ही स्कूटर 140 किमीची रेंज देते. बॅटरी पॅकच्या आधारे Accelero आणि Accelero+ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 53,000 रुपये ते 98,000 रुपयांपर्यंत आहे. तसेच 1.5 kW व्हेरिएंटसाठी 69000 रुपये आणि 3 kW व्हेरिएंटसाठी 98000 रुपये इतकी याची किंमत निश्चित करण्यात आली आहे.   


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI