(Source: ECI/ABP News/ABP Majha)
471 सीसीचे पॉवरफुल इंजिन, एच-स्मार्ट तंत्रज्ञान; येत आहे नवीन CBR500 R स्पोर्ट्स
2023 Honda CBR500R Unveiled: होंडाने नवीन वर्षातील पहिली बाईक लॉन्च करण्याचे संकेत दिले आहेत. अलीकडेच कंपनीने 2023 एडिशन CBR500R (2023 Honda CBR500R) स्पोर्ट्स बाईकबद्दल माहिती उघड केली आहे.
2023 Honda CBR500R Unveiled: होंडाने नवीन वर्षातील पहिली बाईक लॉन्च करण्याचे संकेत दिले आहेत. अलीकडेच कंपनीने 2023 एडिशन CBR500R (2023 Honda CBR500R) स्पोर्ट्स बाईकबद्दल माहिती उघड केली आहे. सध्या ही बाईक आंतरराष्ट्रीय बाजारासाठी सादर करण्यात आली असून कंपनी लवकरच भारतात ही लॉन्च करू शकते. याबाईकमध्ये कंपनीने अधिक आधुनिक फीचर्स दिले आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
कंपनीने 2023 एडिशन CBR500R ग्रँड प्रिक्स रेड कलरमध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये ही बाईक अतिशय स्पोर्टी दिसते. नवीन ग्रँड प्रिक्स रेड पर्यायामध्ये व्हाईट आणि रेड ग्राफिक्ससह रेड रंगाचा समावेश आहे. हा पेंट पर्याय बाईकला CBR650R जबरदस्त लूक देतो. या व्यतिरिक्त ही बाईक स्वॉर्ड सिल्व्हर मेटॅलिकमध्ये देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी चमकदार पिवळ्या हायलाइट्ससह राखाडी आणि काळ्या रंगात सादर करण्यात आली आहे.
कलर अपडेट व्यतिरिक्त बाईकमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. या बाईकमध्ये जुन्या मॉडेलमध्ये असलेले 471cc, पॅरलल-ट्विन सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 47.5 Bhp पॉवर आणि 43 Nm पीक टॉर्क जनरेट करते. बाईकच्या काही प्रमुख फीचर्समध्ये फुल-एलईडी हेडलॅम्प, एबीएस, स्लिपर आणि असिस्ट क्लच आणि एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे.
नवीन CBR500 R लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र भारतातील याची लॉन्च टाइमलाइन अद्याप उघड झालेली नाही. दरम्यान, होंडा टू-व्हीलर्स इंडिया 23 जानेवारी रोजी नवीन दुचाकी लॉन्च करण्याची घोषणा करू शकते. कंपनीने एच-स्मार्ट तंत्रज्ञानासह आपली नवीन दुचाकी लॉन्च केल्याचा खुलासा केला आहे.
एका रिपोर्टनुसार, ही नवीन अॅक्टिव्हा स्कूटर असू शकते. जी एच-स्मार्ट म्हणजेच हायब्रिड इंजिनमध्ये लॉन्च केली जाईल. ही स्कूटर जर हायब्रीड इंजिनमध्ये सादर केली गेली, तर तिचे मायलेज सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त असेल. यामाहा फॅसिनो आणि Ray-Z R स्कूटर हायब्रिड इंजिनमध्ये 60-65 किमी/ली मायलेज देते. Activa Hybrid देखील मायलेजच्या बाबतीत असेच आकडे देईल. दरम्यान, Honda पूर्णपणे इलेक्ट्रिक स्कूटर देखील सादर करू शकते जी भारतीय बाजारपेठेत Ather 450X, TVS iCube आणि Hero Vida V1 सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.
इतर ऑटो सेगमेंटमधील बातमी: