एक्स्प्लोर

Most Expensive Scooters: 'या' आहेत भारतातील 5 सर्वात महागड्या स्कूटर, पाहा संपूर्ण लिस्ट

High Price Range Electric Scooters: भारतीय बाजारपेठेत स्कूटरला नेहमीच अधिक मागणी राहिली आहे. देशातील दुचाकी सेगमेंटमध्ये या वाहनांचा मोठा वाटा आहे.

High Price Range Electric Scooters: भारतीय बाजारपेठेत स्कूटरला नेहमीच अधिक मागणी राहिली आहे. देशातील दुचाकी सेगमेंटमध्ये या वाहनांचा मोठा वाटा आहे. भारतात विविध किंमत रेंजमध्ये अनेक स्कूटर उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला मार्केटमधील सर्वात महागड्या 5 स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या यादीत कोण-कोणत्या स्कूटरचा समावेश आहे...

BMW C 400 GT

सध्या भारतातील सर्वात महागडी स्कूटर BMW C 400 GT आहे, ज्याची किंमत 10.75 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही बाजारात फक्त एकाच प्रकारात उपलब्ध आहे. भारतातील BMW ची ही एकमेव स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये 350 cc वॉटर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर, फोर-स्ट्रोक इंजिन आहे. जे 34 पीएस पॉवर आणि 35 एनएम टॉर्क जनरेट करते. याची  टॉप स्पीड 139 किमी/तास आहे. यात 265mm ड्युअल डिस्क ब्रेकिंग सेटअप आहे.

Keyway Sixties 300i

हंगेरियन दुचाकी उत्पादक Keyway च्या Sixties 300i स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 2.99 लाख रुपये आहे. ही एक रेट्रो-स्टाईल स्कूटर आहे, जी 60 च्या दशकातील स्कूटरसारखी दिसते. स्कूटर 278.8cc सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 18.7 hp पॉवर आणि 22 Nm टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Keyway West 300

Key West 300 स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 2.99 लाख रुपये आहे. Viest 300 ही मॅक्सी दिसणारी स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये 278.8cc इंजिन आहे, जे 18.7hp पॉवर आणि 22 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही स्कूटर मॅट ब्लू, मॅट व्हाईट आणि मॅट ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Vespa Elegante 150 FL

Elegante 150 FL हे भारतातील Vespa चे प्रमुख उत्पादन आहे. या स्कूटरला 150cc इंजिन मिळते, जे 7000 rpm वर 10.47 PS ची पॉवर आणि 5500 rpm वर 10.6 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर बाजारात फक्त एकाच प्रकारात उपलब्ध आहे. याची एक्स-शोरूम किंमत 1.57 लाख रुपये आहे. स्कूटरला समोरच्या बाजूला सिंगल डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला सिंगल-चॅनल ABS सह ड्रम ब्रेक मिळतो.

Vespa SXL 150

Vespa SXL 150 FL भारतीय बाजारपेठेत 1.49 लाख ते 1.54 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. काही महिन्यांपूर्वी या स्कूटरचे एक विशेष व्हर्जन SXL स्पोर्ट नावाने लॉन्च करण्यात आले होते, जे Vespa Elegante 150 FL प्रमाणेच 150cc इंजिनद्वारे समर्थित आहे. ही स्कूटर अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special ReportABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 26 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget