Harley-Davidson X440 Price hike : देशातील सर्वात मोठी कंपनी Hero MotoCorp ने Harley-Davidson X440 च्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. आता या बाईकची किंमत 2,39,500 रुपयांपासून सुरू होईल. या गाडीची  किंमत 10,500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.  गेल्या महिन्यात ही गाडी 2.29 लाख रुपयांच्या  किंमतीत लॉन्च करण्यात आली होती. बाईक लाँच होऊन एक महिनाही झाला नसून तिची किंमत वाढवण्यात आली आहे.  तुम्ही 5000 रुपये भरून ही बाईक बुक करू शकता.


ऑनलाईन बुकिंग (Online Booking)  3 ऑगस्ट रोजी बंद होईल. Harley-Davidson चा लाभ घेण्याची आणि खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. 'Hero MotoCorp हार्ले-डेव्हिडसन X440 चे उत्पादन सप्टेंबरमध्ये उत्तर भारतातील राजस्थान राज्यातील नीमराना येथील कंपनीच्या गार्डन कारखान्यात सुरू करेल आणि ऑक्टोबर 2023 पासून ग्राहकांना वितरण सुरू करेल. ग्राहकांना डिलिव्हरी प्राधान्याने केली जाईल.


मिळेल दमदार इंजिन


या बाइकला ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर 440cc इंजिन देण्यात आले आहे. गाडी सुमारे 30 bhp आणि सुमारे 40 Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते. बाईकच्या पुढील बाजूस 17-इंच टायर आणि मागील बाजूस 18-इंच टायर आहेत. त्याला 210 मिमीच्या ग्राउंड क्लीयरन्ससह स्ट्रीट रॉड देण्यात आला आहे.


कसे असेल डिझाईन


नवीन Harley Davidson X440 मध्ये मस्क्यूलर फ्युएल टँक, गोल हेडलाइट, हेडलाइटच्या वर गोल स्पीडो मीटर, रुंद हँडलबार आणि लो बॉडी पॅनेल्स दिसेल. हेडलाइट  LED प्रोजेक्टर मिळतील ज्यावर Harley-Davidson लिहिलेले असेल. यात USD फ्रंट फोर्क्स, दोन्ही टोकाला सिंगल डिस्क सेटअपसह ड्युअल-चॅनल ABS आणि  मागील बाजूस ट्विन शॉक अॅबजाॅर्बर दिले आहेत.


काय आहेत फिचर्स


फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या बाईकमध्ये एलईडी हेडलाईट, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन देण्यात आले आहे. सस्पेंशनमध्ये इंवर्टेड फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक शोषक यांचा समावेश आहे. याच्या सिंगल-पीस सीटमुळे लांबचा प्रवास आरामदायी होऊ शकतो. या बाईकची थेट स्पर्धा हंटर 350, क्लासिक 350, Meteor आणि Honda Hynes सारख्या बाइक्सशी होऊ शकते. नवीन मोटरसायकलला कॉल-मेसेज अलर्ट आणि डे-नाईट मोडसाठी देखील सपोर्ट मिळेल.


 


इतर महत्वाच्या बातम्या



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI