Fast EV Charging : बेंगळुरू आधारित एनर्जी-टेक स्टार्टअप, एक्सपोनंट एनर्जीने ईव्हीसाठी आपली 15-मिनिटांची फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर केली आहे. बॅटरी पॅक, चार्जिंग स्टेशन आणि चार्जिंग कनेक्टरचा समावेश असलेला कंपनीचा प्रोप्रायटरी एनर्जी स्टॅक, EV बॅटरी पॅक, इलेक्ट्रिक बसेससह, 15 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्णपणे चार्ज करण्यास सक्षम आहे असा कंपनीने दावा केला आहे.


कंपनीच्या मते, एलएफपी (लिथियम आयर्न फॉस्फेट) शेल्सवर फास्ट चार्जिंगमध्ये समस्या निर्माण करणाऱ्या लिथियम प्लेटिंग आणि फास्ट हिट या दोन मुख्य आव्हानांवर काम केले आहे. 


भारतातील वेगवान इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगमधील ही क्रांतिकारी कामगिरी एक्सपोनेंट्स बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS), व्हर्च्युअल सेल मॉडेल आणि डायनॅमिक चार्जिंग अल्गोरिदमद्वारे प्राप्त झाली आहे. हे तिन्ही फास्ट चार्जिंग दरम्यान लिथियम प्लेटिंगमुळे होणारे सेल ऱ्हास टाळण्यास मदत करतात.


रेफ्रिजरेटर वॉटरप्रूफ चार्जिंग


हे बनवणाऱ्या कंपनीने HVAC प्रणालीद्वारे फास्ट चार्जिंग दरम्यान निर्माण होणारी जड उष्णता नियंत्रित केली आहे. कंपनीने आपल्या ट्रेडमार्क केलेल्या बॅटरी पॅकमध्ये प्रत्येक ली-आयन सेल थंड करण्यासाठी रेफ्रिजरेटेड पाण्याचा वापर केला आहे, कोणत्याही परिस्थितीत तापमान 35 अंश सेल्सिअसच्या खाली ठेवले आहे. जे बॅटरीला जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी काम करेल. 4 तासांच्या चार्जिंगच्या उद्योगाच्या सरासरीपेक्षा ते 256 पट अधिक वेगवान असल्याचा कंपनीचा दावा आहे.


एक्सपोनंटने 200 हून अधिक ईव्हीचा वापर करून, बेंगळुरूमधील त्याच्या पायलट प्रोजेक्टमध्ये गेल्या तीन महिन्यांत 25,000 हून अधिक जलद चार्जिंग सत्रे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. तसेच, 1,000,000 किलोमीटरहून अधिक अंतर देखील ईव्हीने कव्हर केले आहे.


अलीकडेच, कंपनीने जाहीर केले की TUV India, एक स्वतंत्र प्रयोगशाळा, 15 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगची 3,000 चार्जिंग सायकल पूर्ण केल्यानंतर केवळ 13% कमी झाली.


महत्त्वाच्या बातम्या :


Ather Electric Scooter : Ather ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 450S येत्या 3 ऑगस्टला भारतात होणार लॉन्च; 'ही' आहेत खास वैशिष्ट्य


Car loan Information:

Calculate Car Loan EMI