Royal Enfield Super Meteor 650: रॉयल एनफिल्ड आपल्या मोठ्या इंजिन असलेल्या क्रूझर बाईक्ससाठी ओळखली जाते. कंपनी 350cc पेक्षा कमी पॉवरफुल बाईक बनवत नाही. यामुळे एनफिल्ड बाईकच्या सर्व्हिसिंग आणि देखभालीचा खर्च सामान्य प्रवासी बाइकपेक्षा जास्त आहे. यातच आता कंपनीकची नवीन बाईकची सर्व्हिसिंगची किंमत एका वेगळ्याच पातळीवर पोहोचली आहे. जी मारुती ब्रेझाच्या पहिल्या सर्व्हिसिंग खर्चापेक्षा जास्त आहे.


नुकत्याच लॉन्च झालेल्या रॉयल एनफील्ड सुपर मेटियर 650 बद्दलची रंजक माहिती समोर आली आहे. या बाईकची सर्व्हिसिंग कॉस्ट बिल इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे.  नवीन Super Meteor 650 च्या पहिल्या सर्व्हिसिंगचे बिल 5,200 रुपये आले आहे. आता याच बिलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


Royal Enfield Super Meteor 650: इतका आहे पहिल्या सर्व्हिसिंगचा खर्च 


या बाईकची पहिली सर्व्हिसिंग 1,000 किलोमीटरहून अधिक अंतर चालवल्यानंतर करण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये या बाईकची सर्व्हिस करण्यात आली आहे. पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये कंपनीने बाईकचे इंजिन ऑइल बदलले. ही बाईक 3.1 लिटर इंजिन ऑइल वापरते, ज्याची किंमत 2,012 रुपये आहे. याशिवाय कंपनीने ऑईल फिल्टरही बदलला ज्यासाठी ग्राहकाला 450 रुपये मोजावे लागले. आणि चेन क्लिनर आणि Lubricant साठी 258 रुपये खर्च झाले. या तिन्ही गोष्टींसाठी कंपनीने एकूण 2,720 रुपयांचे बिल बनवलं आहे.


कंपनी पहिली सेवा मोफत देते आणि त्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. मात्र, ग्राहकांकडून 'उपभोगयोग्य सेवा खर्च' म्हणून 118 रुपये आकारण्यात आले. यानंतर दुचाकीच्या सर्व्हिसिंग बिल 2,836 रुपये आले.


कंपनी पहिल्या सर्व्हिसिंग दरम्यान बाईकसाठी शिफारस केलेली सर्व्हिसिंग करण्याची सूचना देखील करते. यामध्ये बाईकचे ब्रेक, टायर आणि व्हील बॅलन्सिंग दुरुस्त केले जातात.  शिफारस केलेली सर्व्हिसिंग अनिवार्य नाही आणि ती करायची की नाही हे सर्वस्वी ग्राहकावर अवलंबून आहे.



ग्राहकाने सुचविल्यानुसार बाईकची सर्व्हिसिंग करून घेण्यासाठी एकूण किंमत 2,480 रुपये होती. एकूणच,कंपनीने बाईकच्या पहिल्या सर्व्हिसिंगसाठी 5,200 रुपये बिल बनवलं आहे. यातच 8 लाख रुपये किंमत असलेल्या मारुती ब्रेझा कॉम्पॅक्ट SUV च्‍या पहिल्या सर्विसिंगची देखील इतकी किंमत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेझाच्या पहिल्या सर्व्हिसिंगची किंमत 2,400 रुपये आहे, जी इंजिन ऑइल आणि फिल्टर बदलण्यासाठी आहे.


दरम्यान, Royal Enfield Super Meteor 650 जानेवारीमध्ये 3.49 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनी 1 फेब्रुवारी 2023 पासून भारतात या बाईकची डिलिव्हरी सुरू करेल.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI