Hero XPulse 200T 4V launched in India: कसं आहे इंजिन?
नवीन Hero XPulse 200T 4V ला पॉवर देण्यासाठी 200cc BSVI 4 वॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे 8,500 rpm वर 19.1PS ची पॉवर आणि 6500 rpm वर 17.3 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. Xpulse 200T 2V च्या तुलनेत, नवीन इंजिन अनुक्रमे 0.7bhp आणि 0.2Nm अधिक पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, हे 4 व्हॉल्व्ह ऑइल-कूल्ड इंजिन बाईकची कार्यक्षमता अधिक वेगाने सुधारते. नवीन 5-स्पीड गिअरबॉक्स युनिटला एक प्रगत अॅडव्हान्स रेशिओ मिळते. या बाईकमध्ये 37mm फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस 7-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक सस्पेंशन देण्यात आले आहे.
Hero XPulse 200T 4V launched in India: सस्पेंशन
ब्रेकिंगसाठी नवीन Hero XPulse 200T 4V ला सिंगल-चॅनल ABS सोबत 276mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 220mm रियर डिस्क ब्रेक मिळतो. Xpulse 200T 4V 17-इंच कास्ट-अलॉय व्हीलवर धावते. याच्या पुढील आणि मागील बाजूस अनुक्रमे 100/80 आणि 130/70 सेक्शन टायर मिळतात.
Hero XPulse 200T 4V launched in India: फीचर्स
नवीन XPulse 200T 4V बाईक स्पोर्ट्स रेड, मॅट फंक लाइम यलो आणि मॅट शील्ड गोल्ड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे क्रोम रिंगसह वर्तुळाकार पूर्ण एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी पोझिशन लॅम्पसह येते. बाईकला रंगीत व्हिझर, फ्रंट फोर्क गेटर्स, रंगीत सिलेंडर हेड आणि ट्यूबलर पिलियन ग्रॅब मिळतात. यासोबतच यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, अंडर-सीट यूएसबी चार्जर, गियर इंडिकेटर आणि साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ आणि संपूर्ण डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.
या बाईकशी होणार स्पर्धा
Honda CB 200X चा फक्त एक प्रकार उपलब्ध आहे, ज्याची किंमत 1.49 लाख रुपये आहे. CB 200X ला 184.4 cc, 4 स्ट्रोक SI BS-VI इंजिन मिळते, जे 8500 rpm वर 16.99 PS पॉवर आणि 6000 rpm वर 16.1 Nm टॉर्क जनरेट करते.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI